Mumbai Rain : मुंबईकरांनो सावधान! आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

मुंबई : मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून बुधवारी (२३ जुलै) पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला असून वादळी पाऊस (Thunderstorm) आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे (Strong Winds) वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.


शनिवारपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांत अधूनमधून मुसळधार सरी कोसळत आहेत. सध्या मुंबई शहरात सुमारे ३८ किलोमीटर प्रतितास, तर सांताक्रूझ (Santacruz) परिसरात ४३ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. हवामान अभ्यासकांच्या मते, बुधवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.



हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारपर्यंत मुंबईत वादळी पावसाचा प्रभाव कायम राहू शकतो. सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० या २४ तासांत सांताक्रूझ येथे ४४.७ मिमी, तर कुलाबा (Colaba) येथे ३४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून पूर्व उपनगरांमध्ये (Eastern Suburbs) सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या भागात जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाला आहे.


दरम्यान, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे समुद्र (Sea) खवळला असून मंगळवारी मोठ्या लाटा उसळल्या. बुधवारी सकाळी ११:४४ वाजण्याच्या सुमारास समुद्रात २.५३ मीटर उंचीच्या भरतीच्या (High Tide) लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


अधूनमधून पाऊस पडत असल्यामुळे शहरातील जनजीवन (Public Life) पूर्णपणे विस्कळीत झालेले नसले, तरी नागरिकांनी हवामान विभागाच्या इशाऱ्याचा विचार करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसाठी जारी करण्यात आलेला 'यलो अलर्ट' (Yellow Alert) गुरुवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय