Driving Licence Rules : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्सचे कडक नियम लागू!

- ड्रायव्हिंग लायसन्स काढताय? हे नवीन नियम नक्की पाहा!


मुंबई : तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रात ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचे नियम आता पूर्णपणे बदलणार आहेत! होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी नवीन लायसन्स काढण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा." येत्या १ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्र सरकार ड्रायव्हिंग लायसन्ससाठी काही कडक आणि अत्यंत महत्त्वाचे नवीन नियम लागू करत आहे. यातील सर्वात मोठे दोन बदल म्हणजे 'रहिवासी प्रमाणपत्र'आणि 'मराठी भाषेची सक्ती'!काय आहेत नवीन नियम थोडक्यात सांगते. (Driving Licence Rules)



पहिला मोठा नियम आहे रहिवासी प्रमाणपत्राचा. आता लायसन्ससाठी अर्ज करताना तुम्हाला वैध महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असणार आहे. यासाठी तुम्हाला महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य केल्याचा पुरावा द्यावा लागेल. किंवा, जर तुम्ही तसे करू शकत नसाल, तर तुमचे पालक ६ वर्षांपेक्षा जास्त काळ इथले कायमचे रहिवासी असल्याचा पुरावा देणं बंधनकारक असेल." (Driving Licence Rules)



दुसरा आणि सर्वात चर्चेत असलेला नियम म्हणजे 'मराठी भाषेची चाचणी'. विशेषतः जे लोक व्यावसायिक वाहन चालवतात, त्यांच्यासाठी आता कार्यात्मक मराठी भाषेची चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. प्रवाशांशी आणि स्थानिक लोकांशी व्यवस्थित संवाद साधता यावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.""आणि हे नक्की ऐका! जर तुम्हाला ऑटोरिक्षा, टॅक्सी किंवा ॲप-आधारित बाईक-टॅक्सी चालवण्यासाठी व्यावसायिक परवाना हवा असेल, तर तो फक्त अशाच उमेदवारांना मिळेल ज्यांच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र आहे आणि ज्यांना मराठी स्पष्टपणे वाचता आणि बोलता येते. थोडक्यात सांगायचं तर, महाराष्ट्रात कमर्शिअल गाडी चालवायची असेल, तर मराठी आलंच पाहिजे!" सुरक्षित रस्ते आणि जबाबदार चालक घडवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे नवीन नियम योग्य आहेत की अयोग्य? तुमचं मत मला कमेंट्समध्ये नक्की सांगा."ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी प्रहार न्यूजलाईनला फॉलो करा कारण मी कामाची माहिती देतच असते. (Driving Licence Rules)




Comments
Add Comment

मुंबईत मंत्रालयाजवळ बेस्ट बस आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबईतून एक मोठी आणि खळबळजनक अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मंत्रालयाजवळ वाय.

Ayodhya Special Train : मुंबई-अयोध्या प्रवासासाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेच्या 24 विशेष फेऱ्या; जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई: दसरा, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस

Devendra Fadnavis : 'यांचा जो कोणी आका असेल, त्याला लवकरच..' ; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर

Tree Plantation Badlapur : सरकारी प्रकल्पांमधील बाधित झाडांच्या बदल्यात पर्यायी वृक्ष लागवड बदलापुरला...खासगी इमारतींची मुंबईत

सचिन धानजी, मुंबई मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या विस्तारीत मुंबई सागरी किनारी रस्ता(मुंबई

Salman Khan And Lawrence Bishnoi : सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वैर पुन्हा चर्चेत; 2018 पासूनच्या धमक्या आणि हल्ल्यांचा घटनाक्रम

Bollywood Crime News: मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या कथित गोळीबाराच्या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे; 3 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी 3 अज्ञात