Jalgaon Crime News : जमिनीच्या वादातून काकाला संपवलं, अपघाताचा बनाव रचला अन्...

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात गारखेडा (Garkheda) येथे धक्कदायक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याने काकाच्या डोक्यात काठीने प्राणघातक वार करू हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे यानंतर मृतदेह ओढत नेऊन नाल्याच्या कडेला टाकून अपघात झाल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न संशयिताने केला होता. रावेर पोलिसांनी अवघ्या एका दिवसात या खुनाचा छडा लावत संशयिताला अटक केली आहे. (Jalgaon Crime News)




नेमकं प्रकरण काय ?


मयताचा सख्खा पुतण्या २९ वर्षीय अनिल जखा बारेला (Anil Jakha Barela) याचे काका रामा बारेला (Rama Barela) यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून सतत वाद सुरु होते. २१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास हा वाद अधिकच उफाळून आला. रागाच्या भरात संशयिताने घराजवळच पडलेल्या लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार करत त्यांना गंभीर जखमी केले. हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने रामा बारेला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. (Jalgaon Crime News)




अपघाताचा बनाव रचला अन्...


हत्या केल्यानंतर संशय येऊ नये म्हणून संशयित पुतण्याने काकाचा मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेला. त्यानंतर पायवाटे जवळील नाल्याच्या कडेला मृतदेह टाकून अपघाती मृत्यू झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरील परिस्थितीसह जखमांचे स्वरूप पोलिसांना संशयास्पद वाटले त्यामुळे पोलिसांनी घटनेचा बारकाईने तपास केला. पोलिसांच्या तपासामुळे संशयिताचा डाव फसला. (Jalgaon Crime News)




पुतण्या ताब्यात, तपास सुरु


याप्रकरणात पोलिसांनी संशयित अनिल बारेला याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यावेळी त्याने जमिनीच्या वादातून काकाचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलिसांकडून सुरू असून खुनामागील सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे. संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. दरम्यान जमिनीच्या वादातून झालेल्या या खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या