Divija Fadnavis : कोणत्याही आंदोलनात हिंसा अयोग्य- दिविजा फडणवीस

राजकीय पक्षांना आंधळा पाठिंबा नको


मुंबई : "कोणाच्याही चिथावणीला बळी न पडता सोशल मीडियावरील ट्रेंडचे आंधळेपणाने समर्थन करू नका. आंदोलनात हिंसा होणे पूर्णपणे अयोग्य आहे", असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या दिविजा फडणवीस यांनी केले आहे. ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया देताना त्यांनी तरुणांना राजकीय पक्षांच्या जाळ्यात न अडकता सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.


लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक हक्क आहे. मात्र, आंदोलकांनी पोलिसांवर किंवा पोलिसांनी आंदोलकांवर कोणत्याही स्वरूपाची हिंसा करणे चुकीचे असून त्याला अजिबात थारा मिळता कामा नये. शैक्षणिक सुधारणांसाठी किंवा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या चळवळीला पाठिंबा देण्यास हरकत नाही; परंतु या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विशिष्ट राजकीय पक्षांना अथवा त्यांच्या विचारधारेला आंधळेपणाने पाठिंबा देऊ नका. अशा पक्षांचे खरे हेतू ओळखून सतर्क राहणे गरजेचे आहे, असे दिविजा फडणवीस यांनी म्हटले आहे.



विरोधी पक्षांच्या भूमिकेवर भाष्य


लोकशाहीत विरोधी पक्षाच्या भूमिकेवर मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांचे शत्रू बनून त्यांची बदनामी करण्यावर भर देण्याऐवजी देशहित लक्षात घेऊन विकासात्मक निर्णयांना सहकार्य केले पाहिजे. जोपर्यंत विद्यार्थ्यांचे हित केंद्रस्थानी आहे, तोपर्यंत आंदोलनात गैर काहीच नाही. मात्र, जेव्हा एखादे आंदोलन मूळ मुद्द्यावरून भरकटून धार्मिक किंवा राजकीय वळण घेते, तेव्हा त्यामागचे उद्देश पूर्णपणे बदलतात. त्यामुळे तरुणांनी कोणत्याही विचारधारेच्या जाळ्यात न अडकता योग्य ती सावधगिरी बाळगावी, असे आवाहन देखील दिविजा यांनी केले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण