Nashik : गंगापूर धरणातून विसर्गात वाढ; आता 7,413 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Nashik : गंगापूर धरणातून (Gangapur Dam) सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून, गुरुवार (23 जुलै) सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग 6,354 क्यूसेक्सवरून 7,413 क्यूसेक्स करण्यात आला आहे. नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने याबाबत सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. (Increase in discharge from Gangapur Dam)



गंगापूर धरणातून विसर्गात वाढ


पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजता 1,059 क्यूसेक्सने विसर्ग वाढविण्यात आला आहे. तसेच, परिसरातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काळात विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, नदीपात्रात उतरू नये तसेच नदीकाठावर ठेवलेले साहित्य, जनावरे आणि इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिका, जिल्हा प्रशासन (District Administration) तसेच संबंधित विभागांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून कोणताही धोका पत्करू नये, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाने केले आहे



मोसम नदी काठी असणाऱ्यांनाही सावधानतेचा इशारा


त्यासोबतच हरणबारी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना तसेच मोसम नदी काठी असणाऱ्या सर्व महानुभव यांना सावधान तेचा इशारा देण्यात आला आहे, हरणबारी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडवा ६२२१ ने विसर्ग चालू आहे . तेंव्हा पाण्याचा प्रवाह खूपच प्रचंड असल्याने नदी काठी राहणाऱ्या तसेच आपले सामान नदीकाठी असणाऱ्या शेतकरी / इतर लोकांनी जबाबदारीने आपले सामान काढून घ्यावे. तसेच मालेगाव महापालिका (Malegaon Municipal Corporation) हद्दीतील मोसम नदीकाठी असणाऱ्या सर्व लोकांनी आपले चीजवस्तू काढून घेण्यात यावा आणि इतरांना देखील या बाबत सतर्कतेचा इशारा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई