Mumbai Lake : तुळशी, विहार,तानसा पाठोपाठ आता मोडकसागर तलावही भरले

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणार्‍या विहार तुळशी, तानसा या तलावांपाठोपाठ मोडकसागर तलावही गुरुवारी रात्री २ वाजता ओसंडून भरुन वाहू लागले. त्यामुळे एकूण सात तलावांपैकी तीन तलाव भरल्याने मुंबईकरांसाठी खुशखबर असली तरी मुंबईला ६० टक्क्यांहून अधिक पाणी पुरवठा करणार्‍या भातसा तलावांमध्ये ६५ टक्के एवढाच पाणी साठा जमा झाला आहे.


मुसळधार पावसामुळे बुधवारी तानसा तलाव भरले. त्यानंतर गुरुवारी रात्री मोडक सागर तलावही (Lake) भरले. दरवर्षी मोडक सागर (Modak Sagar) तलाव प्रथम भरते आणि त्यानंतर तानसा तलाव भरले जाते. परंतु मागील वर्षांपासून ही प्रथा खंडित झाली आहे. मागील वर्षी तानसा प्रथम आणि त्यानंतर मोडक सागर धरण भरले होते. याही वर्षी तानसा प्रथम आणि दुसऱ्या दिवशी मोडक सागर धरण भरले आहे.



मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ४१०० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी यासर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. मात्र, २३ जुलै २०२६ रोजी यासर्व तलावांमध्ये १०लाख ०९ हजार ४३२ दशलक्ष लिटर्स एवढा पाणीसाठा जमा झालेला आहे. मात्र, मागील दोन वर्षांच्या तुलनेत अजूनही १८ ते १८टक्के पाणी साठा कमी आहे.


मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक-सागर हा तलाव गुरुवारी रात्री २.०७ वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. यंदाच्‍या मोसमातील भरून वाहू लागलेला मोडक-सागर तलाव हा चौथा तलाव आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे.

Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव