Mumbai Metro : महा मुंबई मेट्रोचा नवा विक्रम! एका दिवसात ३.७३ लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास, ७२% प्रवाशांची डिजिटल तिकिटांना पसंती

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक (Public Transport) अधिक वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक (Eco-friendly) बनवणाऱ्या महा मुंबई मेट्रोने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. २१ जुलै रोजी तब्बल ३ लाख ७३ हजार ६३७ प्रवाशांनी महा मुंबई मेट्रोमधून प्रवास करत आतापर्यंतचा सर्वोच्च एकदिवसीय प्रवासी विक्रम (Record) नोंदवला. विशेष म्हणजे, गेल्या ३३ दिवसांत महा मुंबई मेट्रोने तब्बल सहा वेळा नवीन प्रवासी विक्रम प्रस्थापित केले आहेत. यावरून मुंबईकरांचा मेट्रो सेवेला वाढता प्रतिसाद आणि विश्वास स्पष्ट होत आहे.


यासोबतच, २१ जुलै रोजी ७२ टक्क्यांहून अधिक प्रवाशांनी डिजिटल (Digital) आणि कागदविरहित (Paperless) तिकिटांचा वापर केला. पर्यावरणपूरक (Eco-friendly) प्रवासाला प्राधान्य देणाऱ्या मुंबईकरांच्या या निर्णयामुळे हरित (Green) वाहतूक व्यवस्थेला अधिक बळ मिळाल्याचे महा मुंबई मेट्रोकडून सांगण्यात आले.



महा मुंबई मेट्रोने म्हटले आहे की, ही केवळ प्रवाशांची आकडेवारी नसून मुंबईकरांनी दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा आहे. याच विश्वासाच्या बळावर अधिक सुरक्षित, सुलभ, जलद आणि आधुनिक सेवा (Service) देण्यासाठी मेट्रो प्रशासन कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.


गेल्या ३३ दिवसांतील महा मुंबई मेट्रोचे एकदिवसीय प्रवासी विक्रम पुढीलप्रमाणे आहेत. २१ जुलै रोजी ३,७३,६३७ प्रवासी, १५ जुलै रोजी ३,७०,०४७ प्रवासी, १४ जुलै रोजी ३,६८,४२२ प्रवासी, ९ जुलै रोजी ३,६५,८४५ प्रवासी, २३ जून रोजी ३,५८,११५ प्रवासी आणि १९ जून रोजी ३,५७,८९५ प्रवासी.


मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित (Safe), सोयीस्कर (Convenient), जलद (Fast) आणि पर्यावरणपूरक (Eco-friendly) करण्यासाठी महा मुंबई मेट्रो सातत्याने प्रयत्नशील असून, शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा (Public Transport) कणा म्हणून तिची भूमिका अधिक मजबूत होत असल्याचे या नव्या विक्रमातून अधोरेखित झाले आहे.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक