Shaina NC : 'आनंद वारी’ला लाखो वारकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद; शिवसेना प्रवक्त्या शायना एन. सी यांची माहिती

आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी शिवसेना कटिबद्ध; वारकऱ्यांसाठी यंदा प्रथमच एअर अँम्ब्युलन्स सेवा, बाइक अँम्ब्युलन्स



मुंबई: शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांनुसार शिवसेनेकडून सुरु असलेल्या ‘आनंद वारी’ला लाखो वारकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. आषाढ वारी सोहळ्यात पालखी मार्गांवर शिवसेनेच्या वतीने सुरु केलेल्या आरोग्य सुविधांचा आणि निर्मल वारीचा लाखो वारकऱ्यांनी लाभ घेतल्याची माहिती शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव व प्रवक्त्या शायना एन.सी यांनी आज दिली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शायना एन.सी यांनी आषाढी वारीतील त्यांचे अनुभव सांगितले.



त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी आणि आषाढ वारीसाठी अनेक मोठे निर्णय घेतले. तेव्हा सुरु केलेल्या निर्मल वारीला वारकऱ्यांकडून आजही चांगला प्रतिसाद मिळत आहे. वारीतील नोंदणीकृत दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान सुरु करण्यात आले. याबद्दल वारीतील अनेक दिंडीप्रमुखांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. तसेच वारकऱ्यांसाठी ५ लाख रुपयांचा विमा, वारकरी महामंडळासाठी ५० कोटींचा निधी देण्यात आला. या महामंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ वारकऱ्यांना पेन्शन, इंद्रायणी, चंद्रभागा आणि गोदावरी या नद्या प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. पालखी मार्गाच्या विस्तारासाठी आणि विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठे निर्णय घेतले. त्याचा फायदा आज वारीतून दिसत आहे, असे शायना एन.सी म्हणाल्या.



निर्मल वारी अभियानासाठी ३६.७१ कोटींची तरतूद करण्यात आली. वारकऱ्यांना स्वच्छ पाणी, स्वच्छता गृहे, निवारा आणि सुरक्षेसाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. भजनी मंडळांना अनुदान दिल्याचे शायना एन.सी यांनी सांगितले.



त्यापुढे म्हणाल्या की यंदा वारीत प्रथमच एअर अँम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वत: वारीवर लक्ष ठेवून असून त्यांच्या सूचनांनुसार शिवसेना डॉक्टर्स सेलचे १३०० ते १५०० डॉक्टर्स आषाढ वारीत कार्यरत आहेत. त्याचबरोबर ३०० नियमित अँम्ब्युलन्स, २४ कार्डियाक अँम्ब्युलन्स, २२ आयसीयू अँम्ब्युलन्स वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती शायना एन.सी यांनी दिली. महिला वारकऱ्यांसाठी हिरकणी कक्ष असून तेथे स्त्रीरोग तज्ज्ञांची विशेष पथके आहेत. गर्दीच्या ठिकाणी बाईक अँम्ब्युलन्स देखील उपलब्ध केल्याची माहिती शायना एन.सी यांनी दिली. त्यांनी पायी वारी करुन वारकऱ्यांशी संवाद साधला आणि शिवसेनेने सुरु केलेल्या आनंद वारी उपक्रमाविषयी वारकऱ्यांची मते जाणून घेतली. विविध योजनांच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही शायना एन.सी यांनी दिली.


Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने