BMC : महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा नीट कार्यक्रम; आधी सभागृहात गोंधळ, मग सभागृहाबाहेर घोषणाबाजी

महापौरांच्या दालनापूर्वीच भाजपच्या नगरसेवकांनी विरोधकांचा अडवला रस्ता


दोन्ही बाजुंनी तब्बल दोन तासांहून अधिक घोषणाबाजीने तापले वातावरण


मुंबई : मुंबई महापालिकेत (BMC) मागील २५ वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या विरोधकांना सभागृहामध्ये कोणत्या विषयावर चर्चा करता येते याची पूर्ण कल्पना असूनही विरोधकांनी निटच्या मुद्यावरून विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनावरून महापालिका सभागृहात चर्चेची मागणी केली. परंतु नियमानुसार अशाप्रकारची चर्चा करु देता येणार नाही असे सांगत महापौरांनी (Mayor) ही मागणी फेटाळून लावल्यानंतर त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. मात्र, कामकाज पूर्ण झाल्यानंतर महापौरांनी सभागृहाचे कामकाज गुंडाळल्यानंतर विरोधकांनी महापौरांच्या दालनात घुसण्याची रणनिती आखली, पण हा प्रयत्न भाजपच्या नगरसेवकांनी उधळून लावली. त्यामुळे त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नगरसेवक हे आमन सामने येवून एकमेकांविरोधात घोषणाबजी करू लागले. तब्बल दोन तासांहून अधिक तास ही घोषणाबाजी सुरु होती.


मुंबई महापालिका सभागृहात विरोधी पक्षाने विद्यार्थ्यांचे आंदोलन (Protest) आणि त्यांच्यावरील लाठीहल्ला यांचे फोटो झळकवत आंदोलनाची छायाचित्रे दर्शवत केंद्र सरकारच्या (Central Government) विरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली.परंतु सभागृहात यावर चर्चा न झाल्याने विरोधकांनी घोषणाबाजी देत महापौरांच्या दालनात घुसुन हे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजप नेत्यांच्या लक्षात ही बाब येतात त्यांनी तात्काळ आपल्या नगरसेवकांना सूचना देत त्वरीत त्यांच्या विरोधात उभे केले. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत चौकीदार चोर है च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावर तुकडे तुकडे सेनेचा उल्लेख करत राहुल गांधी चोर है, उध्दव ठाकरे चोर है, उध्दव ठाकरे काँग्रेसचा दलाल आहे अशा प्रति घोषणा देण्यास भाजपच्या नगरसेवकांनी सुरुवात केली. त्यामुळे काचेच्या दरवाजा आड सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना अडवल्यानंतर घोषणाबाजी दोन्ही बाजुंनी सुरु होती. त्यामुळे या घोषणाबाजीने महापालिका मुख्यालय परिसर दणाणून गेले होते.



विशेष म्हणजे विरोधकांना सभागृह संपल्यानंतर आपल्या पक्षाच्या कार्यालयात जाण्याचा मार्ग पाठिमागून असतानाही विरोधक माघार घ्यायला तयार नव्हते, आणि विरोधक माघार घेण्यास तयार नसल्याने सत्ताधारी पक्षानेही तिथून न हटण्याचा निर्धार केला. त्यामुळे घोषणाबाजीचे रणसंग्राम दोन्ही बाजुने सुरु होते. साडेचार वाजता सभागृह संपल्यापासून पुढे पावणे सात वाजेपर्यंत दोन्ही बाजुंनी घोषणाबाजी सुरुच होती. विरोधकांनी तर सभागृहाबाहेर ठिय्या मारल्याने सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही तिथे ठाण मांडून बसले.



गोंधळात महापौरांनी उरकले कामकाज


विरोधकांनी नीटच्या मुद्दयावरून सुरु असलेल्या आंदोलनावरून गोंधळ आणि घोषणाबाजी करण्यास सुरु केलेले असताना महापौर रितू तावडे यांनी मागील एप्रिल आणि मे महिन्याचे कामकाज तसेच तातडीचे कामकाज उरकून घेतले. त्यानंतर माजी नगरसेवक कुशल शर्मा यांच्या निधनानिमित्त शोक प्रस्ताव मांडून श्रध्दांजली वाहिली.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा