CBI Raid : मुंबईतून IRCTC च्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक, सीबीआयची कारवाई

मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभाग, सीबीआयने एका लाचखोरी प्रकरणात आयआरसीटीसी मुंबईच्या पश्चिम विभागीय कार्यालयातील वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आणि कोलकाता इथल्या मेसर्स अराहा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.चे संचालक यांना अटक केली आहे. सीबीआयने 22 जुलै 2026 रोजी या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. या सरकारी अधिकाऱ्याने एका खाजगी व्यवसायिकासह इतरांसोबत संगनमत करून, आपल्या पदाचा गैरवापर करत, मोबदल्याच्या स्वरूपात त्यासाठी लाच स्वीकारल्याचा आरोप आहे.



तक्रारीनुसार, संबंधित सार्वजनिक सेवकाने 21 एप्रिल 2026 रोजी 1,98,500 रुपये आणि 8 जून 2026 रोजी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारली. ही रक्कम पंजाब नॅशनल बँकेतील त्याच्या बँक खात्यात रोख स्वरूपात जमा करण्यात आली होती. मेसर्स अराहा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. यांनी सादर केलेल्या प्रलंबित बिलांना मंजुरी मिळवून देण्यासाठी अथवा त्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या मोबदल्यात ही रक्कम स्वीकारल्याचा आरोप आहे. या दोन्ही वेळा संबंधित खासगी कंपनीच्या संचालकाच्या एका सहकाऱ्याने ही रोख रक्कम बँक खात्यात जमा केल्याचेही आरोपात नमूद करण्यात आले आहे. 22 जुलै 2026 रोजी केलेल्या तपासादरम्यान, मुंबई इथल्या, आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागीय कार्यालयात दोन्ही आरोपींची 3,98, 500 रुपयांच्या लाचेची मागणी आणि लाच घेणे, याबद्दल समक्ष चौकशी करण्यात आली. यावेळी संबंधित खासगी कंपनीच्या संचालकाच्या ताब्यातील बॅगेत 4, 49,500 रुपये आणि 13,200 रुपये इतकी रोख रक्कम आढळून आली.


आरोपींच्या मोबाईल फोनमध्ये आक्षेपार्ह व्हॉट्सॲप चॅट्सही आढळले. जप्त करण्यात आलेली रोख रक्कम सीबीआयने ताब्यात घेतली असून, दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त करून सीलबंद करण्यात आले आहेत. तसेच मेसर्स अराहा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. यांनी सादर केलेल्या संबंधित फाईल्स आणि बिलेही जप्त करण्यात आली आहेत. सरकारी अधिकारी आणि संचालक यांच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपींना 22 जुलै 2026 रोजी अटक करून विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 27 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Comments
Add Comment

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

BMC Water Pipeline Leakage : पाणी गळती दुरुस्तीच्या कामांसाठी घाटकोपरला २७ कोटींचा ‘बूस्टर’!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर भागातील जलवाहिनीतून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या जल

Kandivali : स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन बस अपघातातील जखमी युवकावर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचारास नकार!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मालाड – मार्वे रोड, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात २१

Kandivali : कांदिवलीतील डॉ.बाबासाहेब रुग्णालयातील साहित्य खरेदीत गैरव्यवहार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या कांदिवलीतील (Kandivali) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापालिका

BMC : घाटकोपर, मानखुर्द चेंबूर परिसरातील ०६ अनधिकृत लॉजवर जप्तीची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अनधिकृत व्यवसाय आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे. या

मुंबईत ५१ दिवसांमध्ये १६,१५३ बॅनरांची फाडाफाडी

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या बॅनरबाजांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असून