Maharashtra Weather : जुलै संपत आला तरी महाराष्ट्रातील आठ जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातीळ अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. एका बाजूला कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात धुवांधार पावसाने नदी-नाले ओसंडून वाहत असून पुराचे संकट झाले आहे. पालघर ते गुजरात हा महामार्ग मुसळधार पावसामुळे बंद आहे. नाशिकमध्ये गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडल्याने पूर आला आहे. परंतु दुसऱ्या बाजूस राज्यातील तब्बल ८ जिल्ह्यांमध्ये पावसाने अद्याप हजेरी लावली नाही आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील काही भाग पाण्याखाली आहे तर काही भागातील शेतकरी थेंबाथेंबासाठी प्रतीक्षेत आहेत.(Mumabi)



पालघर आणि नाशिकला पावसानं झोडपलं

पालघर, ठाणे, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ तासांत पावसाचा प्रचंड हाहा:कार पाहायला मिळाला. पालघर आणि गुजरातच्या वलसाड भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले असून, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढली आहे. नदीकिनारी असलेलं प्रसिद्ध मारुती मंदिर पाण्याखाली गेलं आहे. सायखेडा पूल पाण्याखाली गेला असून चांदोरी गावातील बाजारपेठ आणि घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. हवामान विभागाने आजही या भागात 'रेड अलर्ट' जारी केला आहे.(Maharashtra)



८ जिल्हे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असताना, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांमध्ये पाऊस रिमझीम बरसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशीव, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये आज तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता जुलै महिना संपायला जेमतेम आठवडा उरला आहे. अर्धा मान्सून संपला आहे तरी राज्याच्या अनेक भागात अद्याप दमदार पाऊस पडलेला नाही. पाऊस न पडल्याने पिके करपू लागली आहेत. आजही राज्यातील आठ जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तिथले शेतकरी हताशपणे आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म