Nashik : ‘दुतोंड्या मारुती’ बुडाला, गंगापूर धरणातील पाणी विसर्गात वाढ

Nashik : नाशिक शहर आणि परिसरात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. मात्र तीन दिवस सुरु असलेल्या संततधार मुसळधार पावसाने नाशिक शहराला अक्षरश झोडपून काढले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गंगापूर धरणातून शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजता होत असेलल्या विसर्गात ४७५ क्युसेकने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता गंगापूर धरणातून एकूण १४४०७ क्युसेक वेगाने पाणी गोदापात्रात सोडले जात आहे.



गंगापूर धरणातून पाणी विसर्गात वाढ


सकाळी पाण्यामुळे गोदापात्रातील दुतोंड्या मारुतीच्या चेहऱ्यापर्यंत पुराचे पाणी आले आहे होते, दरम्यान आता दुतोंड्या मारुती बुडाला आहे. नदीकाठच्या भांडी बाजारात पाणीस शिरले असून सराफ बाजारात देखील पाणी शिरले आहे. गुरुवारी गंगापूर धरणातून करण्यात येणारा विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. सकाळी रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत असलेले पाणी सायंकाळी मानेपर्यंत पोहचले. तर आज मारुती बुडाला आहे. नदीपात्रातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली. रामसेतू पुलावरुन पाणी जात आहे. तर इकडे ग्रामीण भागात गोदावरीचे पाणी निफाड तालुक्यातील चांदोरीमध्ये शिरले आहे.



नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन


गोदावरीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदीकाठच्या काही किरकोळ विक्रेत्यांना आपल्या टपऱ्या, हातगाड्या हलविण्यासही संधी मिळाली नाही. त्या पुराच्या पाण्यात अडकून राहिल्या. गोदावरीचा पूर पाहण्यास नागरिक अहिल्यादेवी होळकर पुलावर गर्दी करीत असल्याने पुलावर वाहतूक कोंडी होत आहे. पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळविताना कसरत करावी लागत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पुरामुळे उदभवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यास प्रशासन समर्थ असून नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Add Comment

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

Nashik Crime : नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik Crime : नाशिक शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Dussehra 2026 : यंदा विजयादशमी २० की २१ ऑक्टोबरला ? जाणून घ्या रावण दहनाची योग्य वेळ आणि पूजेचे मुहूर्त!

भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत पवित्र, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे 'दसरा' किंवा

Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

Dhanush-Mammootty Movie : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चेने