Juhu Beach : जुहू चौपाटीवरील कचरा उचलण्यास विलंब का झाला? संबंधित अधिकाऱ्यांवर करा कारवाई

मागील दहा वर्षातील कंत्राट कामाची चौकशी करा


स्थायी समिती सदस्यांची मागणी


मुंबई : मागील पावसाळ्यात विविध नाले आणि खाड्यांमधून वाहून आलेला कचरा कचरा हा समुद्र किनाऱ्यांवर जमा झाला असून यापैंकी एक असलेल्या जुहु (Juhu) किनारपट्टीवर मोठ्याप्रमाणात कचरा जमा झाला होता. यामुळे मुंबई महापालिकेची (BMC) प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला झाला आहे. येथील कचरा उचलण्यासाठी डंपर (Dumper) आणि जेसीबी (JCB) भाडेतत्वावर घेण्याचे कंत्राट संपुष्टात आल्याने हा प्रकार घडला आहे. हे कंत्राट संपुष्टात येण्यापूर्वी १५ दिवस आधी निविदा मागवली जाते. ही निविदा आधी का मागवली नाही असा सवाल करत ज्या अधिकाऱ्यांमुळे हा विलंब झाला आणि पर्यायाने महापालिकेची बदनामी झाली त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जावी अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली.


जुहू समुद्रकिनाऱ्याची (Juhu Beach) स्वच्छता करण्याकरिता लागणारी ट्रॅक्टर ट्रॉली (Tractor Trolly), बीच क्लिनिंग मशिन (Beach Cleaning Machine), स्कीड लोडर मशिन (Skid Loader Machine) घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या नियोजन विभागामार्फत पुरविण्यात येते. मनुष्यबळ व यंत्रसामग्री वापरुन गोळा केलेला कचरा उचलून देवनार डम्पिंग ग्राऊंडवर नेण्याकरिता डंपर्स आणि जेसीबी मशिन या खासगी संस्थेमार्फत भाडेतत्वावर पुरविण्यात येतात. या डंपर आणि जेसीबी या मशिन्स दीड वर्षांकरता भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपच्या शीतल गंभीर यांनी हीच कंपनी दादर आणि माहीम समुद्र चौपाटी करता असून मागील काही दिवसात याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता अशी तक्रार केली. तर भाजपच्या प्रीती सातम यांनी मागील दहा दिवसांत जुहू समुद्रकिनारी कचरा गोळा झाल्याने महापालिकेची सोशल मीडियावर मोठी बदनामी झाली. हा कचरा उचलण्यासाठी कंत्राटदार नेमला आहेत तरी याची स्वच्छता का झाली नाही असा प्रश्न पडला. पण याचे उत्तर या प्रस्तावाच्या अनुषंगाने मिळाले असून याचे कंत्राट संपुष्टात येण्यापूर्वी १५ दिवस आधी याची निविदा काढली जाते. अधिकाऱ्यांच्या या निष्काळजी पणामुळे याला विलंब झाला असून त्यामुळे कचरा वेळेत उचलला गेला नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जावी,अशी मागणी केली. मागील दहा दिवसात याठिकाणी १८३५ मेट्रिक टन कचरा निर्माण झाला आहे. आमच्या पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमितजी साटम यांनी प्रशासनाला निर्देश केल्यानंतर हा कचरा त्वरीत हटवला आणि भविष्यात याठिकाणी कचरा येऊ नये यासाठी मोठे नाले आणि खाडी परिसरात ट्रॅशबुम ही यंत्रणा बसवण्याची मागणी केली आहे.असे सांगत मागील वेळेपेक्षा नावाने नेमलेल्या कंत्राटदाराने १८०० ते१३०० एवढा दर कमी देवू केला आहे. त्यामुळे यापूर्वी प्रत्येक शिफ्ट करता जास्त दर घेतला जात होता. त्यामुळे मागील दहा वर्षात असे कंत्राट दिलेल्या कामांची चौकशी केली जावी अशीही मागणी प्रीती सातम यांनी केली.



भाजपचे तेजिंदर सिंग तिवाना यांनी सर्व समुद्र चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटल्स (Plastic Bottels) आणि इतर कचरा टाकला जातो. त्यांच्याकडून दंड आकारला जावा. तसंच आमचे मुंबई अध्यक्ष यांच्या संकल्पनेनुसार ट्रॅशबुम ही यंत्रणा कधी आणि कुठे बसवले जाणार आहे याची देण्यात यावी. तर उबाठा नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी यासाठी जी कंपनी पात्र ठरली आहे त्यांनी उणे २६ टक्के दराने काम मिळवले असून त्यांचा अनुभव काय आहे.तसेच त्यांचे एमडी आणि भागीदार कोण आहेत याची माहिती मिळावी. जेणेकरून कुणी जुन्या कंपनीचे मालक नाव बदलून तर आले नाही ना याची माहिती मिळेल.


तर एमआयएमचे (MIM) जमीर कुरेशी यांनी या कंपनीची नोंदणी डिसेंबर २०२५ मध्ये झाली असून डिझेल, मनुषबळ आदींचा खर्च ते २६ टक्के कमी देऊन कसा भागवणार असा सवाल केला. तर उबाठाचे शैलेश फणसे यांनी पावसाळ्यात (Rain) समुद्र किनाऱ्यावर कचरा अधिक येतो म्हणून मनुष्यबळ अधिक असते. मग इथे एक डंपर (Dumper) आणि एक जेसीबी (JCB) घेऊन काय करणार असा सवाल केला. तर मनसेचे (MNS) यशवंत किल्लेदार यांनी वेगवेगळे एजन्सी असल्याने हा प्रकार घडत असून एकाच कंत्राटदाराकडे ही जब्बदारी सोपवायला अशी मागणी केली. तर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर अतिरिक्त आयुक अविनाश ढाकणे यांनी समाधानकारक उत्तर दिल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. या डंपर आणि जेसीबी पुरवण्यासाठी दीपक ऍन्ड सन्स ट्रान्सकॉन एलएलपी या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला १८ महिन्यांच्या कालावधीसाठी २.४२ कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने