Navnath Ban : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून महिला पोलिसाचा विनयभंग?

भाजपचा आरोप; चित्रा वाघ, नवनाथ बन यांच्याकडून व्हिडिओ शेअर


मुंबई (Mumbai): मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन झाल्याचा आरोप विरोधकांनी केला जात असतानाच, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. भाजपने माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Sharadchandra Pawar) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावरच एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.



भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ प्रसृत करत अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रस्त्यावर ठिय्या मांडणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना जेव्हा महिला पोलीस कर्मचारी उठवत होत्या, तेव्हा अनिल देशमुख यांचा हात एका महिला पोलिसाला लागून विनयभंग झाल्याचा दावा वाघ यांनी केला आहे.(Anil Deshmukh)


या संदर्भात भाष्य करताना चित्रा वाघ म्हणाल्या, “स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी मुंबई पोलिसांवर खोटे आरोप करणाऱ्या संधीसाधू लांडग्यांनो, आता डोळे उघडा आणि नीट बघा! ज्या मुंबई पोलिसांच्या नावाने कालपर्यंत थयथयाट करत होतात, त्याच मुंबई पोलीस दलातील एका महिला पोलिसाचा विनयभंग तुमच्याच महाविकास आघाडीचा माजी गृहमंत्री करत आहे. आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? ताकद असेल तर त्याला आघाडीतून तात्काळ हद्दपार करा”, असे आव्हान वाघ यांनी दिले.



विरोधकांचा दुटप्पीपणा - नवनाथ बन(Navnath Ban)

दुसरीकडे, भाजपचे मुख्य प्रवक्ते नगरसेवक नवनाथ बन यांनीही हा व्हिडिओ शेअर करत विरोधकांना घेरले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या आठवड्यात एका आंदोलनादरम्यान अनिल देशमुख यांनी एका महिला पोलिसाशी कसे गैरवर्तन केले हे स्पष्ट दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. “आता रोहित पवार आणि वर्षा गायकवाड हे अनिल देशमुख यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत की मूग गिळून गप्प बसणार?” असा सवाल बन यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, भाजपने केलेल्या या आरोपांवर अद्याप अनिल देशमुख अथवा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Comments
Add Comment

हिरो एक्स्ट्रीम 160आर 4व्ही आणि 250आरच्या अपडेटेड बाइक्स लाँच; किंमत जाणून घ्या...

दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने भारतीय बाजारात 2026 मॉडेलची अपडेटेड हिरो एक्स्ट्रीम 160आर 4व्ही आणि अपडेटेड

Ekta Kapoor : "धर्माचं पालन करणं ही समस्या कधीपासून झाली?"; चित्रपटसृष्टीतील 'हिंदूफोबिया'वर एकता कपूर संतापली

टेलिव्हिजन विश्वाची 'क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आपल्या बोल्ड व यशस्वी कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या

गुजरात हादरले! भरूचमधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; 5 कामगारांचा जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

भरूच (गुजरात) : गुजरातच्या भरूच जिल्ह्यात एका रासायनिक कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला

Delhi mumbai expressway Accident : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खातूश्यामजीच्या दर्शनासाठी निघालेल्या ८ भाविकांचा मृत्यू, ९ जण गंभीर जखमी

शनिवारी सकाळी राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. मध्य प्रदेशातील (Madhyapradesh) खातूश्यामजी

Nashik : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड ! अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून फेटाळला

Nashik : राज्यभर चर्चेत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या

Tech Addiction : लहान मुलांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेण्याची वेळ आलीय? सुप्रीम कोर्टाची केंद्राला मोठी नोटीस

नवी दिल्ली : आजकाल प्रत्येक पालकाची एकच डोकेदुखी असते ती म्हणजे, "माझं मूल दिवसभर मोबाईल आणि सोशल मीडियावर काय