Mumbai Police Viral Video : आंदोलक विद्यार्थिनीशी पोलिसांकडून गैरवर्तन नाही!

- व्हायरल व्हिडिओवर मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण


मुंबई : मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्याने एका महिला आंदोलकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, या व्हिडिओवर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले असून संबंधित कर्मचाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन झाले नसल्याचा दावा केला आहे. व्हिडिओमधील दृश्याचा चुकीचा आणि दिशाभूल करणारा अर्थ लावला जात असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Mumbai Police)



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर येथील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात (Shivaj Park Police Station) कार्यरत असलेले पोलीस हवालदार दीपक बल्लाळ हे आंदोलन संपल्यानंतर आंदोलकांना पुन्हा भडकावणाऱ्या एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते. दीपक बल्लाळ हे एका दिशेला पाहून त्या आंदोलकाच्या कॉलरला पकडत असतानाच, अटकाव (Arrest) करण्याच्या उद्देशाने संबंधित तरुणी अचानक त्यांच्या मार्गात आली. पोलीस अधिकारी दुसऱ्या दिशेला पाहत असल्याने हा प्रकार घडला असून, सोशल मीडियावर केला जाणारा दावा चुकीचा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेची सखोल पडताळणी व व्हिडिओचे बारकाईने परीक्षण करूनच वस्तुस्थिती समोर आणल्याचे मुंबई पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.





विरोधकांचे आरोप काय?


तत्पूर्वी, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत, “स्वतःच्या मुलीच्या वयाच्या तरुणीशी असे कृत्य करणाऱ्यावर तातडीने विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलीस दलातून बडतर्फ करा,” अशी मागणी केली होती. तसेच, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या व्हिडिओवरून राज्य सरकार आणि पोलिसांच्या कारवाईच्या पद्धतीवर टीका केली होती. मात्र, पोलिसांच्या स्पष्टीकरणानंतर या दाव्यांमधील हवा निघून गेली असून कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा