"विरोधकांकडून केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी मुंबई पोलिसांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा गंभीर आरोप नवनाथ बन यांनी केला. रोहित पवारांनी पोस्ट केलेल्या 'त्या' व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. (Navnath Ban)
नवनाथ बन यांनी म्हटले की, संबंधित व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावून मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले. मात्र, व्हिडिओ नीट पाहिल्यास संबंधित पोलीस अधिकारी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करताना दिसत नाहीत. उलट ते निळ्या शर्टमधील एका व्यक्तीला पकडण्यासाठी धावत असल्याचे स्पष्टपणे दिसते, असा दावा त्यांनी केला.राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सोशल मीडियावरील व्हिडिओचा विपर्यास करण्यात आला असून, त्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोणत्याही घटनेबाबत सार्वजनिक आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थितीची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. (Mumbai Police) रोहितदादा, तुमच्या राजकीय फायद्यासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी मुंबई पोलीसांना बदनाम करू नका. फक्त सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा तथ्यांची पडताळणी करूनच सार्वजनिक आरोप करायला हवेत. तुमचं हे राजकारण बघून जनतेच्या डोक्यात तिडीक येते हे लक्षात ठेवा. दरम्यान, या प्रकरणावर रोहित पवार किंवा संबंधित पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. (Political News)रोहित पवार यांनी राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरील एका व्हिडिओचा विपर्यास करून मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. वस्तुस्थिती अशी दिसते की, संबंधित पोलीस अधिकारी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करतांना दिसत नाहीत. ते निळ्या शर्टमधील व्यक्तीला पकडण्यासाठी धावत गेले… https://t.co/CQwfr9tJML pic.twitter.com/2hdBKVAOEY
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) July 24, 2026





