Security tightened : राज्यातील संवेदनशील ठिकाणे आणि वरिष्ठ नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटण्याची शक्यता आणि आगामी राजकीय मोर्चे लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस दल सतर्क झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील महत्त्वाच्या शासकीय इमारती, संवेदनशील ठिकाणे तसेच व्हीआयपी नेत्यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, 'वर्षा' बंगल्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारून वाहनांची व संशयित व्यक्तींची कसून तपासणी केली जात आहे. या परिसरात पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे. याशिवाय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. इतर काही मंत्री, खासदार आणि आमदारांच्या निवासस्थानीही सुरक्षेसाठी जादा पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे.



मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात सुरक्षेची तटबंदी उभारण्यात आली आहे. प्रवेशद्वारांवर येणाऱ्या-जाणाऱ्यांची आणि वाहनांची बारकाईने तपासणी केली जात आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) तुकड्याही राज्यातील अत्यंत संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.



मोठ्या शहरांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त


मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी ठाकरे बंधूंचा शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आंदोलनाच्या मार्गावर आणि सभास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. राज्यातील सर्वच संवेदनशील भागांवर पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष असून, गुप्तचर यंत्रणांमार्फत क्षणाक्षणाच्या घडामोडींवर नजर ठेवली जात आहे. स्थानिक पोलिसांना सतत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म