Nashik : एकाच रात्री तब्बल 24 शेतकऱ्यांच्या केबल लंपास; चांदवडच्या शेतकऱ्यांमध्ये संताप

Nashik : चांदवड तालुक्यातील रायपूर, भडाणे फाटा आणि समिट परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रविवारी मध्यरात्री तब्बल २४ शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारी आणि सोलर पंपांच्या केबल चोरून नेण्यात आल्या. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.



तांब्याची तार लंपास, शेतकऱ्यांमध्ये संताप


चोरट्यांनी केबलचे प्लास्टिकचे आवरण घटनास्थळीच फेकून देत आतील तांब्याची तार (copper wire) लंपास केली. एकाच रात्री इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या चोरीमागे सराईत टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी मोटारी व सोलर पंपांच्या बिलांची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जुन्या मोटारींची बिले उपलब्ध नसल्याने आणि सोलर पंपांची बिले कंपन्यांकडून सहज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.



चोरट्यांचा बंदोबस्त करावा , शेतकऱ्यांची मागणी


रेल्वेमार्गालगतचा हा परिसर असल्यामुळे यापूर्वीही अशा प्रकारच्या चोऱ्या घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.या चोरीत राजेंद्र घुमरे, सखाराम गुंड, राजाराम गुंजाळ, राजेंद्र कोळपकर, सुनील उगले यांच्यासह एकूण २४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



160 कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यास धुळ्यात अटक


दरम्यान, दुसरीकडे बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी तथा तत्कालीन शिक्षणाधिकारी ६६ वर्षीय शशिकांत भाऊराव हिंगोणीकर (Shashikant Hingonikar) यांना नाशिक पोलिसांच्या तपास पथकाने धुळे येथून अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील 459 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट शालार्थ आयडी (Shalarth ID Scam) तयार करून वेतन आणि थकबाकीची रक्कम उचलल्याचा आरोप आहे. पोलीस तपासानुसार, शशिकांत हिंगणीकर हे जळगाव जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना कोणताही वैध प्रस्ताव नसताना बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण घोटाळ्यात आतापर्यंत सुमारे 1,200 आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर