Dr. Mohan Bhagwat : तरुणांना सूचना देण्याऐवजी संवाद साधणे आवश्यक

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; कुटुंबव्यवस्था बळकट करण्याचे आवाहन


मुंबई (Mumbai ): आजच्या नवीन पिढीच्या जडणघडणीसाठी पालकांनी सूचना किंवा उपदेश देण्याऐवजी मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केले. भौतिक गोष्टींचा प्रभाव असणाऱ्या आणि माहितीच्या चक्रव्यूहात वाढणाऱ्या आजच्या तरुणांना कठोर पवित्र्यापेक्षा प्रेमाने व विश्वासाने गोष्टी समजावून सांगण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच घरात मोबाईलच्या अतिवापरामुळे कमी होत चाललेल्या संवादाबद्दल चिंता व्यक्त करताना, पालकांनी स्वतः आदर्श आचरणाचा वस्तुपाठ मुलांसमोर ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.(Dr. Mohan Bhagvat)




विश्वमांगल्य सभेच्या वतीने आयोजित ‘युगानुकूल मातृत्व’ या विषयावरील प्रबोधन बैठकीच्या समारोप सत्रात डॉ. भागवत बोलत होते. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील ९०० हून अधिक प्रबुद्ध महिला उपस्थित होत्या. सरसंघचालक म्हणाले की, पूर्वीच्या काळात अनुभवाच्या आदरावर मोठ्यांचे बोलणे लगेच स्वीकारले जात असे. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. मुले सातत्याने प्रश्न विचारतात. “देवतांचा चेहरा हत्ती किंवा माकडासारखा का आहे?” अशा प्रश्नांची उत्तरे अनेकदा पालकांकडे नसतात. मुलांच्या जिज्ञासांचे निरसन करण्यासाठी पालकांनी स्वतःचे ज्ञान वाढवणे आवश्यक आहे. तसेच मुलांच्या पहिल्या १२ वर्षांतील जडणघडणीत योग्य संस्कार व्हावेत, यासाठी सुरुवातीपासूनच पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्या देवतांविषयीची शास्त्रीय व योग्य माहिती समाविष्ट केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.(Mumbai News)








भारतीय ज्ञानपरंपरेवर विश्वास हवा


भारतीय संस्कृती आणि इतिहासाबद्दल अनेकदा जाणीवपूर्वक गैरसमज आणि भ्रम पसरवला जातो, असे सांगून डॉ. भागवत म्हणाले की, आपली ज्ञानपरंपरा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आणि अत्यंत मजबूत पायावर उभी आहे. पाश्चात्त्य जीवनशैलीचे अंधानुकरण करण्याऐवजी भारतीय दृष्टिकोनावर आधारित कुटुंबव्यवस्था व समाजव्यवस्था अधिक सुदृढ करण्याची आज गरज आहे. विविधतेत एकात्मता हेच भारतीय संस्कृतीचे मूळ तत्त्व असून, इतिहास आणि जीवनमूल्यांवर श्रद्धा ठेवून समाजाने पुढे गेले पाहिजे.
Comments
Add Comment

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी