Mumbai Rain : मुंबईत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७६ टक्के पडला पाऊस

मुंबई : मुंबईत (Mumbai) आतापर्यंत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७५ ते ७६ टक्के एवढ्या पावसाची (Rain) नोंद झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. हवामान खात्याच्या अंदाज घेणाऱ्या वेधशाळेच्या नोंदीनुसार आतापर्यंत शहरात ७४.२९ टक्के तर उपनगरांत ८०.७३ टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत सरासरी २१०० ते २३०० मि.मी एवढा पाऊस पडला जातो. त्यातुलनेत आतापर्यंत शहरात १५५३ मि.मी आणि उपनगरांत १८७२ मि.मी एवढ्या पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे.



मुंबईत शहरातील पावसाची नोंद कुलाबा वेधशाळेच्या माध्यमातून आणि उपनगरांतील पावसाची नोंद सांताक्रुझ (Santacruz) वेधशाळेच्यावतीने घेतली जाते. मुंबई शहरात मागील २४ तासांमध्ये ५४.८ मि.मी आणि उपनगरांत २१.२ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी २४ जुलैपर्यंत शहर भागात ४३.०४ टक्के अर्थात ९०१ मि.मी एवढा पाऊस पडला होता तर उपनगरांत ४९.६९ टक्के अर्थात ११५२ मि.मी एवढा पाऊस पडला होता.


तर महापालिका स्वयंचलित पावसाळी यंत्रावर नोंदवलेल्या नोंदीनुसार शहर भागात ६६. ६० टक्के व उपनगरांत ७१.९३ टक्के एवढा पाऊस पडला आहे. यात आतापर्यंत शहरांत ६६.६० टक्के म्हणजे १३९५.२७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व व पश्चिम उपनगरात ७१.९३ टक्के अर्थात पूर्व उपनगरात १६९६.७४ मि.मी व पश्चिम उपनगरात १६३९.३२ मि.मी एवढा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा