Nashik : मुसळधार पावसाने सातशे कुटुंब बेघर; पूरस्थितीने अनेकांचे स्थलांतर

Nashik : नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हातील जवळपास सर्वच धरणे तुडुंब भरली आहे. ज्यामुळे अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने निफाड तालुक्यातील चांदोरी आणि सायखेड्यात पूरस्थिती निर्माण होऊन शेकडो कुटुंबीयांवर बेघर होण्याची वेळ आलीय. तर चांदोरीत तब्बल ४०० कुटुंबांचे तर सायखेड्यात २५० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. चांदोरीत या पुरामुळे तब्बल १०० तर सायखेड्यात १२५ दुकानांमधील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.



मुसळधार पावसाने सातशे कुटुंब बेघर


या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदमचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार सोबतच ग्रामीणच्या अपर पोलिस अधीक्षक विमला एम. यांनी पूरग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पूरग्रस्त भागात काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांची वाहतूक शक्य नसल्याने सीईओ पवार यांनी थेट ट्रॅक्टरवरून पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेतली. यानंतर सर्व विभाग प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायतीमार्फत सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या राहण्याच्या व इतर आवश्यक सुविधांची पाहणी करण्यात आली.



जायकवाडीच्या विसर्गावर आमदार देवयानी फरांदे संतप्त


नाशिकमधून जायकवाडी धरणाकडे नेमके किती पाणी सोडण्यात आले? जून महिन्यात जायकवाडीतील पाणीसाठा किती होता? आणि या विसर्गावर नियंत्रण नेमके कोणाचे आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती करत आमदार देवयानी फरांदे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नाशिककरांच्या हक्काच्या पाण्याबाबत माहिती लपवली जात असल्याचा आरोप करत, यापुढे कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.



अधिकृत आकडेवारी न मिळाल्याने संतप्त


जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून (Nandur-Madhyameshwar weir) तब्बल ९४ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. हे पाणी जायकवाडी धरणात प्रत्यक्षात किती पोहोचले, याची अधिकृत आकडेवारी मागितल्यानंतर प्रशासनाकडे त्याची माहितीच उपलब्ध नसल्याचे समोर आले. यावर संतप्त होत आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. नाशिकमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा हिशेबच नसणे ही गंभीर बाब असून, अधिकारी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला. जायकवाडी धरणात सध्या अवघा ३१ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील २४ टक्के मृतसाठा वजा केल्यानंतर उपयुक्त पाणीसाठा अत्यल्प राहतो. अशा परिस्थितीत मृतसाठ्याचा नियमबाह्य वापर झाला आहे का, याची चौकशी करण्याची मागणी फरांदे यांनी केली. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण