BMC News : पश्चिम उपनगरांतील सहा ठिकाणी नाले, नदींवर ट्रॅश बुमची प्रणाली

दोन वर्षांसाठी मोजणार १४.४६ कोटींचा खर्च


मुंबई : मुंबईतील (Mumbai) पश्चिम उपनगरातील एकुण ०६ ठिकाणांवर नदी, नाल्यांमधील जमा होणारा तरंगता कचरा काढण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ट्रॅश बुमसहित तराफा आरुढ कचरा वाहक प्रणालीचे मागील पाच वर्षांचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर आता पुढील दोन वर्षांचे देखभालीचे कंत्राट दिले जात आहे. या दोन वर्षांसाठी १४.४६ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.


मुंबईतील अनेक नदी (River), नाल्यांमधील (Drain) आणि खाड्यांमधील तरंगता कचरा समुद्रात (Sea) वाहून जातो. तसेच पावसाळी पाण्याचा निचरा जास्तीत जास्त जलदगतीने होऊन पूरसदृश्य परिस्थिती उदभवू नये यासाठी अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये गाळ काढणे व ट्रॅश बुम (Trash Boom) प्रणाली बसवले जाते. त्यामुळे माध्यमातून नदी तथा नाल्यातील तरंगता कचरा काढणे ही कामे प्रामुख्याने करण्यात येतात. महानगरपालिकेला खारफुटीचा भाग प्लास्टिक मुक्त ठेवण्याकरिता नाले आणि नद्यांमधील तरंगता कचरा वाहून समुद्रात थेट जाण्यापासून रोखण्याकरीता योग्यती कार्यवाही करण्याचे निर्देश हरित लवादाने सहा वर्षांपूर्वी दिलेले आहेत. तसेच तरंगता प्लास्टिक व इतर कचरा जमा करुन त्याची विल्हेवाट लावण्याकरिता ट्रॅश प्रणाली बसविण्याची शिफारस केलेली होती.



याच अनुषंगाने जुलै २०२२ मध्ये मुंबई उपनगरामधील गजधरबंध नाला, मेन अव्हेन्यू नाला, मोगरा नाला, ओशिवरा नदी, पोईसर नदी, दहिसर नदी या सहा ठिकाणी आणि वाकोला नदी, मिठी नदी (नेचर्स पार्क) व मिठी नदी (बीकेसी ब्रीज) या तीन ठिकाणी पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यावतीने ट्रॅश बुमसह तराफा आरुढ कचरा वाहक प्रणाली बसविण्यात आली होती.


अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार खारफुटीचा भाग प्लास्टिक मुक्त ठेवण्याकरिता ही प्रणाली या नदी नाले यांच्या प्रवाहाच्या सर्वात शेवट्च्या ठिकाणी (पातमुखांवर) बसविण्यात आल्या आहेत. सहा ठिकाणी बसवण्यात आलेल्या ट्रॅशबुम च्या देखभालीचे कंत्राट ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपुष्टात आलेल्या होत्या. त्यानंतर कंत्राटातील ४ टक्के आकस्मिकता वापरुन सदर सहा प्रणालींचे देखभाल फेब्रुवारी २०२६ पर्यंत कंत्राटदारामार्फत करण्यात आले होते.


त्यानुसार आता पश्चिम उपनगरातील एकुण ०६ ठिकाणांबर नदी/नाल्यांमधील जमा झालेला तरंगता कचरा बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्याकरीता ट्रॅश बुमसहित तराफा आरुढ कचरा वाहक प्रणालीचे दोन वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी व्हर्गो स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली असून या दोन वर्षांच्या देखभालीसाठी १४ कोटी ४६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर