Tree Cutting : मुंबईत महापालिका प्रकल्पांसह विद्युत कंपनीसह इमारत बांधकामांत कापली जाणार १४४३ झाडे

 

सचिन धानजी

कापण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात लावली जाणार २१ हजारांहून अधिक झाडे


मुंबई : मुंबईत (Mumbai) येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेच्या विविध प्रकल्पांसह इमारतींच्या बांधकामांमध्ये तब्बल १४४३ झाडे (Trees) बाधित होणार असून यातील ९०२ झाडे कापली जाणार आहेत. तर ५४१ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहे. मात्र, यासर्व कापल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात तब्बल २१ हजारांहून अधिक झाडे लावली जाणार आहेत. यातील काही झाडे ही मुंबईत तर काही झाडे ही मुंबई बाहेर पालघर जिल्ह्यात जावली जाणार आहेत.


मुंबई महापालिकेच्यावतीने कोस्टल रोडला जाणारा ऑरेंज गेट (Orange Gate) ते मरिन ड्राईव्ह (Marine Drive) या प्रकल्प कामासाठी मुंबईतील १२ हून अधिक इमारतींच्या प्रकल्प कामांमध्ये बाधित होणारी झाडे कापणे आणि पुनर्रोपित करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर झालेले आहेत. यामध्ये तब्बल १३०० हून अधिक झाडे बाधित होत असल्याने त्यातील काही झाडे कापण्यासाठी तसेच काही झाडे पुनर्रोपित करणे तसेच काही झाडे तिथेच ठेवली जाणार असल्याने यासर्व बाधित होणारी झाडे काढण्यासाठीचे प्रस्ताव उद्यान विभागााल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार हे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणापुढे मंजुरीला ठेवण्यात येत आहे.



अंधेरी (Andheri) पूर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ हद्दीतील बांधकाम, दहिसर गांव वासुदेव शुंगी रोड मॅनेजमेंट डेव्हलपमेंट सेंटरचे बांधकाम, कांदिवली चारकोप सेक्टर दोन अदानी इलेक्ट्रीक सब स्टेशन (Electric Sub Station) बांधकाम, बोरीवली मागाठाणे इमारत बांधकाम, मरिन ड्राईव्ह ऑरेंज गेट, इस्टर्न फ्रि वे ते मरिन ड्राईव्ह कोस्टल रोड भूमिगत रस्ता प्रकल्प, मलबारहिल कारमाईकल रोड अर्थात एम.एल डहाणूकर मार्ग इमारत पुनर्विकास प्रकल्प, पवई आयआयटी प्रस्तावित इमारत क्रमांक बी २६ आणि बी २७चा पुनर्विकास, बीएआरसी ओल्ड मंडाला ते न्यू मंडाला जोड रस्ता, हिरानंदानी उद्यान पवई परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, घाटकोपर पूर्व किरोळ सदभावना, त्रिमूर्ती आणि ओम चैतन्य गगनगिरी महाराज एसआरए प्रकल्प, पोईसर गाव लक्ष्मी नगर रेाड येथे इमारतीचा पुनर्विकास प्रकल्प, मागाठणे गाव बोरीवली हरी ओम को ऑफ हौसिंग सेसायटी इमारत बांधकाम आदी प्रकल्प कामांचा समावेश असून यात बाधित होणारी झाडे कापण्याचे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणापुढे ठेवले जात आहेत. यात सुमारे ९०० झाडे कापली जाणार असून ५५० आसपास झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. तर या बदल्यात २२, ६२५ झाडे लावली जाणार आहेत.




  • एकूण बाधित झाडे : १४४३

  • कापली जाणारी झाडे : ९०२

  • पुनर्रोपित केली जाणारी झाडे : ५४१

  • एकूण बदल्यात लावण्यात येणारी झाडे : २१६२५


कोणत्या बांधकाम प्रकल्पात किती झाडे होणार बाधित आणि किती कापली जाणार…




  • अंधेरी पूर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ हद्दीतील बांधकाम

  • एकूण झाडे बाधित : ८३(कापणे : ३३, पुनर्रोपित : ५०)

  • बदल्यात लावण्यात येणारी झाडे : १३१९


 

दहिसर गांव वासुदेव शुंगी रोड मॅनेजमेंट डेव्हलपमेंट सेंटरचे बांधकाम




  • एकूण झाडे बाधित : १२३(कापणे : १११, पुनर्रोपित : १२)

  • बदल्यात लावण्यात येणारी झाडे : १९६३


कांदिवली चारकोप सेक्टर दोन अदानी इलेक्ट्रीक सब स्टेशन बांधकाम




  • एकूण झाडे बाधित : ५९ (कापणे : ३४, पुनर्रोपित : २५)

  • बदल्यात लावण्यात येणारी झाडे : ७३६


बोरीवली मागाठाणे इमारत बांधकाम




  • एकूण झाडे बाधित : ३२० (कापणे : २२८, पुनर्रोपित : ९२)

  • बदल्यात लावण्यात येणारी झाडे : ५३००


मरिन ड्राईव्ह ऑरेंज गेट, इस्टर्न फ्रि वे ते मरिन ड्राईव्ह कोस्टल रोड भूमिगत रस्ता प्रकल्प




  • एकूण झाडे बाधित : ६६(कापणे : ०३, पुनर्रोपित : ६३)

  • बदल्यात लावण्यात येणारी झाडे : १४४०


 

मलबारहिल कारमाईकल रोड अर्थात एम.एल डहाणूकर मार्ग इमारत पुनर्विकास प्रकल्प




  • एकूण झाडे बाधित : १२५(कापणे : ६९, पुनर्रोपित : ५९)

  • बदल्यात लावण्यात येणारी झाडे : २६०१


पवई आयआयटी प्रस्तावित इमारत क्रमांक बी २६ आणि बी २७चा पुनर्विकास




  • एकूण झाडे बाधित : १२६(कापणे : ४४, पुनर्रोपित : ८२)

  • बदल्यात लावण्यात येणारी झाडे : १८९५


बीएआरसी ओल्ड मंडाला ते न्यू मंडाला जोड रस्ता




  • एकूण झाडे बाधित : २९९(कापणे : २५१, पुनर्रोपित : ४८)

  • बदल्यात लावण्यात येणारी झाडे : २२११


 

हिरानंदानी उद्यान पवई परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प




  • एकूण झाडे बाधित : १२६(कापणे : ४४, पुनर्रोपित : ८२)

  • बदल्यात लावण्यात येणारी झाडे : १८९५


 

घाटकोपर पूर्व किरोळ सदभावना, त्रिमूर्ती आणि ओम चैतन्य गगनगिरी महाराज एसआरए प्रकल्प




  • एकूण झाडे बाधित : ३३(कापणे : २९, पुनर्रोपित : ०४)

  • बदल्यात लावण्यात येणारी झाडे : ६२९


पोईसर गाव लक्ष्मी नगर रेाड येथे इमारतीचा पुनर्विकास प्रकल्प




  • एकूण झाडे बाधित : ४१(कापणे : ३३, पुनर्रोपित : ०८)

  • बदल्यात लावण्यात येणारी झाडे : १०३१


मागाठणे गाव बोरीवली हरी ओम को ऑफ हौसिंग सेसायटी इमारत बांधकाम




  • एकूण झाडे बाधित : ३८(कापणे : २२, पुनर्रोपित : १६)

  • बदल्यात लावण्यात येणारी झाडे : ६०५

Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या