Shocking incident in Mumbai : आधी टीबी, मग दमा; चिमुकलीच्या फुप्फुसात ७ वर्षे अडकले होते पेनचे झाकण!

मुंबई: वैद्यकीय क्षेत्रात अचूक निदान किती महत्त्वाचे असते, याचे एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकरण मुंबईतून समोर आले आहे. मुंबईतील धारावी परिसरातील एका १० वर्षांच्या चिमुकलीच्या फुप्फुसात तब्बल ७ वर्षांपासून पेनचे झाकण अडकले होते. मात्र, विविध डॉक्टरांनी याकडे दुर्लक्ष करत तिला टीबी (क्षयरोग) आणि दमा असल्याचे भासवून तब्बल ७ वर्षे चुकीचे आणि जड उपचार सुरू ठेवले. या गंभीर चुकीच्या निदानामुळे चिमुकलीला आणि तिच्या कुटुंबियांना मोठा शारीरिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागला असून, शेवटी तिची फुप्फुसाची शस्त्रक्रिया करावी लागली आहे.



नेमकी काय होती घटना?


धारावीत राहणाऱ्या या १० वर्षांच्या मुलीला लहानपणापासूनच सतत खोकला येणे, वजन झपाट्याने कमी होणे आणि फुफ्फुसात वारंवार निमोनिया होणे असा त्रास होत होता. सुरुवातीला अनेक डॉक्टरांनी तिला नुसती अँटीबायोटिक्स दिली. त्यानंतर तिला एका रुग्णालयात दाखल केले असता, थुंकीची चाचणी निगेटिव्ह आलेली असतानाही डॉक्टरांनी तिच्यावर 'प्रिझम्प्टिव्ह टीबी'ची अत्यंत जड औषधे सुरू केली. टीबीची औषधे देऊनही मुलीच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे पालकांनी तिला एका खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तिला 'दमा' (अस्थमा) असल्याचे सांगत इनहेलर वापरण्याचा सल्ला दिला. परंतु, या सर्व उपचारांचा मुलीच्या प्रकृतीवर कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही, उलट तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली.



सीटी स्कॅन आणि ब्रॉन्कोस्कोपीमुळे उघडकीस आला प्रकार


मुलीची प्रकृती अत्यंत खालावत गेल्याने पालकांनी तिला अखेर एका बाल रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तिची सखोल तपासणी करत सीटी स्कॅन आणि ब्रॉन्कोस्कोपी केली. सीटी स्कॅनच्या अहवालात मुलीचे एक फुप्फुस आकुंचन पावलेले दिसून आले. जेव्हा डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपी केली, तेव्हा डाव्या फुप्फुसाच्या नळीत अत्यंत खोलवर एक पेनचे झाकण अडकलेले आढळले. नाक-कान-घसा (ENT) तज्ज्ञ आणि ॲनेस्थेशिया टीमच्या संयुक्त प्रयत्नांनंतर हे झाकण यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले.



शस्त्रक्रिया करून फुप्फुसाचा भाग करावा लागला काढूण


पेनचे झाकण बाहेर काढल्यानंतर मुलीला तात्काळ काहीसा आराम मिळाला आणि संसर्ग कमी झाला. परंतु, हे परकीय वस्तू सदृश झाकण गेल्या ७ वर्षांपासून फुप्फुसात तसेच अडकून राहिल्याने तिथला भाग पूर्णपणे सडला होता आणि शरीरात गंभीर संसर्ग पसरला होता. डॉक्टरांनी महिनाभर वाट पाहिली की फुप्फुस पुन्हा पूर्ववत पसरते का, परंतु संसर्गामुळे पेशी पूर्णपणे मृत झाल्या होत्या. शेवटी चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना तिच्या फुप्फुसाचा सुमारे एक तृतीयांश भाग शस्त्रक्रिया करून काढावा लागला.



पालकांचा संताप


सध्या डॉक्टरांच्या मते मुलगी आता धोक्याबाहेर असून ती भविष्यात सामान्य आयुष्य जगू शकेल. परंतु, केवळ सुरुवातीच्या डॉक्टरांच्या चुकीच्या आणि थातुरमातुर निदानामुळे आपल्या चिमुकलीचा जीव धोक्यात आला आणि उपचारांवर मोठा आर्थिक भार व मानसिक त्रास सहन करावा लागला, असा तीव्र संताप मुलीच्या आईने व्यक्त केला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील योग्य निदानाच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर