Nashik Simhastha Kumbh Mela : कावनईत गंगा-गोदावरी पूजन, कुंभमेळ्यातील स्नानाची आणखी एक तारीख जाहीर

Nashik Simhastha Kumbh Mela : पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. मात्र सिंहस्थ कुंभाचे मूळ स्थान मानल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधाराकडे अद्यापही अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर कावनई येथे गंगा-गोदावरी पूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी विकासकामांबाबत मोठी घोषणा केली, तर वैष्णव आखाड्यांनी कपिलधारा (Kapildhara) येथील पारंपरिक स्नानाची तारीखही अधिकृतपणे जाहीर केली.



जिल्ह्यात ११६ कोटी रुपयांची विकासकामे सुरू


कावनई येथे आयोजित गंगा-गोदावरी पूजन सोहळ्यात मंत्री छगन भुजबळ यांनी श्रीक्षेत्र कपिलधारा हे सिंहस्थाशी ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या जोडलेले महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याचे सांगितले. या परिसराचा सर्वांगीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढे त्यांनी सांगितले की, मागील सिंहस्थानंतर परिसरात रस्ते, सिमेंट काँक्रीट रस्ते, तलाव विकास, रिंग रोडसह विविध पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या असून उर्वरित कामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील. आगामी सिंहस्थाच्या तयारीसाठी नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि जिल्हाभरात सुमारे ११६ कोटी रुपयांची विकासकामे सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. (Nashik Simhastha Kumbh Mela)



गोदावरीसह सर्व जलस्रोत स्वच्छ ठेवण्याचे आवाहन


देश-विदेशातून लाखो भाविक येणार असल्याने रस्ते, वाहतूक, पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छता, निवास व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी शासन नियोजनबद्ध पद्धतीने काम करत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तसेच गोदावरीसह सर्व जलस्रोत स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचे आवाहन करत पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणावरही भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आमदार हिरामण खोसकर यांनी ग्रामपंचायत, तीर्थक्षेत्र विकास समिती आणि प्रशासनाच्या समन्वयातून तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे आवाहन त्यांनी केले.(Nashik Simhastha Kumbh Mela)



कपिलधारा प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र


यावेळी वैष्णव आखाड्यांच्या प्रतिनिधींनी श्रीक्षेत्र कपिलधारा येथे होणाऱ्या पारंपरिक स्नानाची तारीख १७ ऑगस्ट २०२७ अशी अधिकृतपणे जाहीर केली. तसेच सिंहस्थ प्राधिकरणाच्या अधिकृत नियोजनात कपिलधारा (Kapildhara) तीर्थक्षेत्राचा समावेश करण्याची मागणीही त्यांनी केली. संत-महंतांनी कपिलधारा हे प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र असल्याचे सांगत त्याच्या धार्मिक वारशाचे जतन करण्याबरोबरच भाविकांसाठी अधिक सुविधा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. महंत फलाहारी महाराज यांनी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, संत-महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'