Government Decision : आजपासून 'ऑर्केस्ट्रा बार'चे परवाने बंद!

गृह विभागाचा निर्णय; जुन्या परवान्यांचे नूतनीकरणही थांबवले


मुंबई : हॉटेल, उपाहारगृहे आणि बारमधील अश्लील नृत्यांवर बंदी घालणाऱ्या कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन ‘ऑर्केस्ट्रा’च्या नावाखाली सुरू असणाऱ्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी गृह विभागाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. यापुढे राज्यात ‘महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१’ अंतर्गत ऑर्केस्ट्रासाठी नवीन परवाने दिले जाणार नाहीत, तसेच जुन्या परवान्यांचे नूतनीकरणही केले जाणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागाने सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी करून सर्व पोलीस यंत्रणांना कठोर अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.(Mumbai)



राज्यात ‘महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष (dance bar ) मधील अश्लील नृत्यांवर बंदी घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २०१६’ लागू झाल्यानंतर डान्स बारवर कठोर निर्बंध आले होते. मात्र, या नियमांमधून सुटका करून घेण्यासाठी अनेक आस्थापनांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील ‘सार्वजनिक मनोरंजन नियमावली’चा गैरवापर करत ‘ऑर्केस्ट्रा’ (Live musical performance) परवाने मिळवण्याचा मार्ग निवडला होता. या परवान्यांच्या आड पुन्हा अश्लील नृत्य आणि इतर गैरप्रकार सुरू असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते.



या गैरप्रकारांना अटकाव करण्यासाठी गृह विभागाने ऑर्केस्ट्रा आस्थापनांनाही २०१६ च्या अश्लील नृत्यबंदी कायद्याच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २ जुलै २०२६ च्या मंत्रिमंडळ बैठकीतील मान्यतेनंतर, नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हे सुधारित विधेयक संमत करण्यात आले. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर २२ जुलै २०२६ रोजी या अधिनियमाची माहिती राज्य शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली.

पोलीस यंत्रणांना कठोर अंमलबजावणीचे आदेश


या नव्या सुधारणेच्या आधारे गृह विभागाच्या सहसचिव मुग्धा धुरी यांच्या स्वाक्षरीने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि जिल्हादंडाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे पोलीस अधिनियमांतर्गत ऑर्केस्ट्राचे कोणतेही नवीन परवाने मंजूर केले जाणार नाहीत आणि जुन्या परवान्यांची मुदत संपल्यानंतर त्यांचे नूतनीकरण केले जाणार नाही, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा