Nitesh Rane : मोर्शीतील अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या बांधकामाला गती देण्यात आली असून, हा प्रकल्प दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले.



मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत महाविद्यालयाच्या बांधकामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीला मत्स्यव्य वसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन., आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.



मंत्री राणे म्हणाले की, राज्यातील मत्स्य क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे, आधुनिक संशोधनाला चालना देणे आणि विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, त्याच्या प्रत्येक टप्प्याचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.



महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत मोर्शी येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली असून, शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.


महाविद्यालयासाठी मोर्शी येथे सुमारे 4.08 हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी सिंभोरा येथील राष्ट्रीय मत्स्य बीज केंद्राची सुमारे 33 हेक्टर जमीन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडे विनामूल्य हस्तांतरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.



बैठकीत प्रकल्पाच्या कामात कोणताही विलंब होऊ नये, गुणवत्तेची तडजोड होऊ नये आणि नियोजित वेळेत बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.


मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयामुळे आधुनिक शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला चालना मिळणार असून, विदर्भासह राज्यातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव