Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेलचा राज्यभर विस्तार; राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन होणार

मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाणार आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती' स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी या निर्णयाची माहिती दिली.



केंद्राच्या २०२९ पर्यंत देश अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्दिष्टानुसार महाराष्ट्रातही व्यसनमुक्तीची व्यापक चळवळ उभारली जात आहे. नवीन निर्णयानुसार, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्थापन होणाऱ्या समित्या विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेविषयी सातत्याने जनजागृती करतील. विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल वेळेत ओळखून त्यांना आवश्यक समुपदेशन उपलब्ध करून देणे, पालक व शिक्षकांमध्ये समन्वय साधणे आणि गरज भासल्यास मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणे ही या समित्यांची मुख्य जबाबदारी असेल.



येत्या ३० जुलै रोजी वरळी येथील डोम सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचा अधिकृत शुभारंभ होणार आहे. हा केवळ औपचारिक सोहळा नसून वर्षभर चालणारी जनचळवळ असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले. या मोहिमेत विद्यार्थी, शिक्षक, पालक, स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आणि मानसोपचारतज्ज्ञांचा सक्रिय सहभाग असणार आहे. वर्षभरात शैक्षणिक संस्थांमध्ये विविध मार्गदर्शन सत्रे, संवाद आणि जनजागृतीपर उपक्रम राबवले जाणार असून या लोकचळवळीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही मंत्री लोढा यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या

BMC Road Work : आता वारंवार चर खणल्याने रस्त्यांचे होणारे नुकसान होणार कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर विविध उपयोगिता जाळे अर्थात