MEMU Train Accident : धक्कादायक! भिलाडजवळ विरार-भरूच ट्रेनची चार चाके रुळावरून घसरली आणि ...

अहमदाबाद : गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना टळली. उमरगाम तालुक्यातील भिलाड रेल्वे स्टेशनजवळ विरारहून भरूचकडे जाणाऱ्या MEMU ट्रेनची चार चाके अचानक रुळावरून घसरली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (MEMU Train Accident)


मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १९१०१ विरार-भरूच MEMU भिलाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येत असताना सकाळी सुमारे ६ वाजून २७ मिनिटांनी हा प्रकार घडला. ट्रेनच्या पुढील बाजूच्या DMC कोचची चार चाके रुळावरून घसरली. हा DMC कोच म्हणजे चालक ज्या डब्यातून ट्रेन चालवतो तो भाग असून तो इंजिनप्रमाणे कार्य करतो. (MEMU Train Accident)



घटना घडताच स्टेशन परिसरात एकच गोंधळ उडाला. अचानक ट्रेनचा डबा रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील अधिकारी, तांत्रिक पथक आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वलसाड येथून अपघात निवारण पथक (Accident Relief Team) आणि वैद्यकीय मदत पथकही रवाना करण्यात आले. (MEMU Train Accident)



रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत कोणताही प्रवासी किंवा रेल्वे कर्मचारी जखमी झालेला नाही. सध्या रुळावरून घसरलेली चाके पुन्हा रुळावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेचा परिणाम मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर झाला असून काही गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे. ट्रेनची चाके नेमकी कोणत्या कारणामुळे रुळावरून घसरली, याचा तपास रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे. तांत्रिक तपासणीनंतर अपघाताचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. (MEMU Train Accident)

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि