Nagpur Crime : १०.४६ लाखांची फसवणूक, जीवे मारण्याची धमकी आणि लैंगिक अत्याचार; नागपुरातील दोघांविरुद्ध गुन्हा

नागपूर : मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेकडून १०.४६ लाख रुपये उकळल्याचा आणि त्यानंतर तिला धमकावून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे.या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध फसवणूक,बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (nagpur crime)



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मोहम्मद शाफत शेख (२८)आणि मोहम्मद नावेश शेख (२६)यांनी संबंधित महिलेचा विश्वास संपादन करत तिला मालमत्तेच्या व्यवहारातून मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवले.या बहाण्याने त्यांनी वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून एकूण १०.४६ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. (nagpur crime)


तक्रारीनुसार,आर्थिक व्यवहारानंतर आरोपींनी महिलेवर दबाव आणत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.महिलेने विरोध केल्यावर तिला तसेच तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.हा प्रकार कुणालाही सांगितल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल,अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. (nagpur crime)


या धमक्यांमुळे महिला काही काळ गप्प राहिली.मात्र,दोन्ही आरोपींकडून वारंवार लैंगिक अत्याचार होत असल्याने अखेर तिने धाडस करून पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (nagpur crime)


प्राथमिक माहितीनुसार,दोन्ही आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.महिलेसोबत झालेले आर्थिक व्यवहार,उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, आरोपींच्या भूमिकेचा तपास केला जात आहे. (nagpur crime)


 
Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण