Pimpri-Chinchwad Crime : धक्कादायक! दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करणारा ६५ वर्षीय आरोपी अटकेत

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरातून मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडील मजुरीसाठी घराबाहेर असताना दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ६५ वर्षीय शेजाऱ्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. (Pimpri-Chinchwad Crime)


मिळालेल्या माहितीनुसार, रमजान बागवान (वय ६५) याने १० आणि ४ वर्षांच्या दोन अल्पवयीन बहिणींना धमकावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना काही दिवसांपासून सुरू असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. (Pimpri-Chinchwad Crime)



शेजारी राहणाऱ्या महिलेच्या सतर्कतेमुळे उघड झाला प्रकार :


या गंभीर प्रकाराचा उलगडा शेजारी राहणाऱ्या एका जागरूक महिलेच्या सतर्कतेमुळे झाला. मुलींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने संबंधित महिलेने त्यांच्या आईला याची माहिती दिली. त्यानंतर आईने मुलींशी संवाद साधला असता घडलेला प्रकार समोर आला. त्यानंतर तातडीने वाकड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. (Pimpri-Chinchwad Crime)



आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल :


तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी रमजान बागवान याला अटक केली. आरोपीविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रॉसिटी) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri-Chinchwad Crime)



या प्रकरणाचा तपास वाकड पोलीस करत असून, आरोपीने यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात संतापाची लाट उसळली असून, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Pimpri-Chinchwad Crime)

Comments
Add Comment

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच