Mumbai Dabbawala Tourist Centre : चर्चगेट रेल्वे स्थानकासमोरील डब्यांच्या देवाण-घेवाणीचे ऐतिहासिक स्थळ मुंबई डबेवाला पर्यटक केंद्र बनवा

डबेवाला संघटनेची मुंबई महापालिकेकडे मोठी मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : चर्चगेट रेल्वे स्थानकासमोरील (Churchgate Railway Station) डब्यांच्या देवाण-घेवाणीच्या ऐतिहासिक स्थळाचा मुंबई डबेवाला पर्यटक केंद्र (Mumbai Dabbawala Tourist Centre) म्हणून विकास करण्यात यावा, जेणेकरून देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईच्या या अद्वितीय परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, तसेच वांद्रे (पश्चिम) येथील रिझवी महाविद्यालय परिसरात असलेले डबेवाला भवन अर्थात मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र हे महानगरपालिकेने निःशुल्क करून द्यावे, डबेवाला भवनासाठी आत्तापर्यंत महानगरपालिकेकडून आकारण्यात आलेले सर्व भाडे विशेष बाब म्हणून पूर्णपणे माफ करण्यात यावे आदी मागण्या महापौर आणि महापालिका आयुक्त यांची संयुक्त भेट घेत सोमवारी डबेवाला संघटनेच्या शिष्टमंडळाने केल्या.



मुंबई डबेवाला संघटना (मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन) शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांसंदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात सोमवारी २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी भेट घेतली.यावेळी आमदार श्रीकांत भारतीय, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, बाजार व उद्याने समिती अध्यक्ष हेतल गाला, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड तसेच नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके, मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे, सचिव किरण गवांदे, खजिनदार सुनील शिंदे, खजिनदार जयसिंग पिंगळे, सदस्य अशोक कुंभार, श्री. कैलास शिंदे, मच्छिंद्र जगताप, माऊली बच्चे आणि डबेवाला संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते.



याप्रसंगी डबेवाला संघटनेच्या शिष्टमंडळाने महापौर व महानगरपालिका आयुक्त यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद केले आहे की, वांद्रे (पश्चिम) येथील रिझवी महाविद्यालय परिसरात असलेले डबेवाला भवन अर्थात मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र हे महानगरपालिकेने निःशुल्क करून द्यावे, डबेवाला भवनासाठी आत्तापर्यंत महानगरपालिकेकडून आकारण्यात आलेले सर्व भाडे विशेष बाब म्हणून पूर्णपणे माफ करण्यात यावे, डबेवाला भवन परिसरातील रस्त्यास संघटनेचे संस्थापक कै. महादू हावजी बच्चे यांचे नाव देण्यात यावे, मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांजवळ डबेवाल्यांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित सायकल पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये नोंदणीकृत डबेवाल्यांना वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, चर्चगेट रेल्वे स्थानकासमोरील डब्यांच्या देवाण-घेवाणीच्या ऐतिहासिक स्थळाचा मुंबई डबेवाला पर्यटक केंद्र (टुरिस्ट पॉईंट) म्हणून विकास करण्यात यावा, जेणेकरून देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईच्या या अद्वितीय परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, इत्यादी मागण्या या निवेदनात नमूद केल्या आहेत.



याप्रसंगी बोलताना आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले की, सुमारे १३० वर्षांपासून कार्यरत असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांची विश्वासार्हता आणि परंपरा खूप मोठी आहे. वारकरी संप्रदायाशी जोडलेल्या या संघटनेने मुंबईच्या संस्कृतीत मानाचे स्थान मिळवले आहे. मराठी माणसाचा अभिमान असलेली ही संघटना आणि तिची येणारी पिढी अधिक सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य अपेक्षित आहे.


डबेवाल्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करणे, ही महानगरपालिकेची सामाजिक जबाबदारी- महापौर


मुंबईतील डबेवाले ही फक्त सेवा नसून ते मुंबईच्या श्रमसंस्कृतीचे मोठे प्रतीक आहे. डबेवाल्यांची कार्यपद्धती ही जगभरातील व्यवस्थापन क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यामुळे डबेवाल्यांचे प्रश्न सोडविणे, त्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करणे, ही महानगरपालिकेची सामाजिक जबाबदारी आहे. हे लक्षात घेऊन डबेवाला संघटनेने मांडलेल्या मागण्या मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिली. तसेच, नोंदणीकृत डबेवाल्यांना वैद्यकीय उपचारांसाठी महापौर वैद्यकीय सहायता निधीतून रुपये २५ हजार मदत तत्काळ प्रदान करण्यात येईल, अशी घोषणाही महापौर रितू तावडे यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.