BMC : मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील स्वच्छतेविषयक कामांची आयुक्तांनी केली पाहणी, असे दिले निर्देश..

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी पूर्व उपनगरातील मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील स्वच्छतेविषयक कामांची आज सकाळी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.या भेटीदरम्यान मानखुर्द रेल्वे स्थानक (Mankhurd Railway Station) आणि गोवंडी रेल्वे स्थानकाजवळील (Govandi Railway Station) घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चौक्यांना भेटी दिल्या. स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती, हजेरीपट, स्वच्छतेसाठी लागणारी यंत्रसामग्री आदींची देखील माहिती घेतली. एम पूर्व विभागातील दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी दोन सत्रात काम करावे. वाहनांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी. काही संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश भिडे यांनी दिले.


यावेळी भिडे यांनी कचरा संकलन करणाऱ्या कॉम्पॅक्टर वाहनाच्या मार्गाची आकस्मिक तपासणी केली. कार्यपद्धतीचे बारकाईने निरीक्षण करत त्यांनी स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. भिडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून दैनंदिन कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण कसे केले जाते याचा आढावा घेतला. तसेच झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे कचऱ्याचे वर्गीकरण संदर्भात प्रबोधन करण्याच्या सूचना दिल्या.



मानखुर्द व गोवंडी रेल्वे स्थानक परिसरात दुतर्फा सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी असलेली बेवारस वाहने व अस्वच्छते बाबत स्वतंत्र मोहीम हाती घेऊन येत्या काही दिवसात हा रस्ता स्वच्छ करण्याचे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले. उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (परिमंडळ ५) संध्या नांदेडकर, सहाय्यक आयुक्त उज्ज्वल इंगोले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या