Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थातून नाशिकची जगभरात होणार नवी ओळख - राज्यपाल जिष्णू देव वर्मा

Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा केवळ धार्मिक सोहळा न राहता नाशिकची जागतिक पातळीवर ओळख निर्माण करणारा महत्त्वपूर्ण पर्व ठरेल, असा विश्वास राज्यपाल जिष्णू देव वर्मा (Governor Jishnu Dev Verma) यांनी व्यक्त केला. कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे त्यांनी कौतुक करत, सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सूक्ष्म नियोजनावर भर देण्याच्या सूचना दिल्या.




सिंहस्थातून नाशिकची जगभरात होणार नवी ओळख


नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात राज्यपाल श्री. वर्मा यांनी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी राज्यपाल वर्मा म्हणाले, उद्योग, पर्यटन आणि संस्कृतीच्या क्षेत्रातही नाशिकची स्वतंत्र ओळख निर्माण होईल. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून कुंभमेळ्याचे नियोजन अधिक सक्षम करता येईल, कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता असून, समाज माध्यमांमुळे भाविकांना माहिती सहज उपलब्ध होणार आहे. पावसाळ्यात होणाऱ्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, आरोग्य, वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम आणि आयुक्त शेखर सिंह यांनी सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी रामकाल पथ, मलनि:स्सारण प्रकल्पासह विविध कामांचा आढावा सादर केला. (Nashik Simhastha Kumbh Mela)




प्रयागराज कुंभमेळ्याच्या अनुभव लक्षात घ्यावा


प्रयागराज कुंभमेळ्याच्या अनुभवाचा विचार करून अधिक प्रभावी तयारी करावी, अशा सूचना राज्यपाल वर्मा यांनी दिल्या. कुंभमेळ्यासाठी राज्य शासनामार्फत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. ही कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याबरोबरच त्र्यंबकेश्वरचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन दीर्घकालीन विकासकामे करावीत, असे राज्यपालांनी सांगितले. आवश्यकतेनुसार कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर करावा, अशी सूचनाही राज्यपालांनी केली. (Nashik Simhastha Kumbh Mela)



यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, उपायुक्त नियोजन योगेंद्र चौधरी, त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर