Sunetra Pawar : मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आणि अजित पवारांच्या जयंतीदिनी ९५ हजार नागरिकांनी आरोग्यसेवांचा लाभ घेतला

'महा आरोग्य शिबिराला' राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ८ हजार ९४० नागरिकांनी रक्तदान केले


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'महा आरोग्य शिबिराला' नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानातून आरोग्यसेवा जनतेच्या दारी पोहोचविण्यात यश आले असून, ९५ हजार नागरिकांना आरोग्यसेवांचा लाभ देण्यात आला. ८ हजार २४६ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी दिली.



मुश्रीफ यांनी सांगितले की, राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये तसेच शासकीय दंत, आयुर्वेद आणि होमिओपॅथी महाविद्यालयांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने विविध विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. राज्यभरात एकूण ४० शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयात विविध ठिकाणी एकाच वेळी हे आरोग्य शिबीर घेण्यात आले. प्रत्येक महाविद्यालयाने विभागनिहाय समित्या स्थापन करून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ व कनिष्ठ निवासी डॉक्टर, इंटर्न, परिचारिका, तंत्रज्ञ, लिपिक तसेच इतर कर्मचाऱ्यांनी या अभियानात उल्लेखनीय योगदान दिले. स्वयंसेवक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हे अभियान यशस्वी ठरले.



राज्यभर राबविण्यात आलेल्या या अभियानात रक्तदान शिबिरे, स्तन कर्करोग तपासणी, गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, बोन मिनरल डेन्सिटी व हाडांची तपासणी, नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मुख कर्करोग तपासणी तसेच विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. शिबिरांमध्ये तपासणीत संशयित अथवा बाधित आढळलेल्या लाभार्थ्यांची स्वतंत्र नोंदणी करून त्यांना तातडीने संबंधित रुग्णालयात पुढील तपासणी व उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.



२२ ते २८ जुलै या कालावधीत राज्यभरातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या अभियानातून ८,९४० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. तसेच स्तन कर्करोग तपासणीत ८,२४२, गर्भाशय मुख कर्करोग तपासणीत ४,६३४, बोन मिनरल डेन्सिटी व अस्थिरोग तपासणीत १२,७३३, नेत्र तपासणीत १५,३९३ आणि मुख कर्करोग तपासणीत ९,६०७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. विविध तपासण्यांनंतर ८,२४६ लाभार्थ्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले, तर जनजागृती कार्यक्रमांसह एकूण ९४,८७८ नागरिकांपर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचला.




कुठे काय उपक्रम?


शासकीय वैद्यकीय महाविद्यालये मुंबई (J.J. and G.T.), पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, बारामती, नांदेड, अकोला, जळगाव, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, गोंदिया, अंबाजोगाई, लातूर, सातारा, अलिबाग आणि नाशिक येथे नियोजनबद्ध पद्धतीने विविध विशेष तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय शासकीय दंत महाविद्यालये मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव तसेच शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, कागल येथे मुख कर्करोग तपासणी शिबिरे घेण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती आणि कोल्हापूर येथे डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे (Laparoscopic) हर्निया शस्त्रक्रिया, स्थूलता तपासणी आणि विशेष मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन करण्यात आले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने