Mumbai News : कित्येक वर्ष टीबी आणि दमा समजून उपचार पण ...; १० वर्षांच्या मुलीला मिळाले नवे जीवन

मुंबई : एखाद्या आजाराचे योग्य वेळी आणि अचूक निदान किती महत्त्वाचे असते, याचे उदाहरण मुंबईतील धारावी येथे समोर आले आहे. सतत खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने १० वर्षांच्या मुलीवर तब्बल ७ वर्षे टीबी आणि नंतर दम्याचे उपचार सुरू होते. मात्र, अनेक वर्षे औषधे घेऊनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने करण्यात आलेल्या सखोल तपासणीत तिच्या फुफ्फुसात पेनाचे टोपण अडकले असल्याचे उघड झाले.



लहानपणापासूनच या मुलीला वारंवार खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि छातीत संसर्गाची लक्षणे दिसत होती. सुरुवातीला डॉक्टरांनी क्षयरोगाचा संशय घेत उपचार सुरू केले. त्यानंतरही प्रकृती सुधारली नाही म्हणून दम्याची औषधे दिली गेली. मात्र सात वर्षे उपचार करूनही त्रास कायम राहिल्याने पालकांनी अखेर तिला विशेष बाल रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात सीटी स्कॅन(CityScan) आणि ब्रॉन्कोस्कोपी(bronchoscopy) केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. तपासणीत मुलीच्या डाव्या फुफ्फुसाच्या श्वासनलिकेत अत्यंत खोलवर पेनाचे प्लास्टिकचे टोपण अडकले असल्याचे डॉक्टरांना दिसून आले. त्यामुळे एक फुफ्फुस आकुंचन पावले होते आणि सतत संसर्ग होत होता.
यानंतर फुफ्फुसरोगतज्ज्ञ(Pulmonologist), नाक-कान-घसा (ENT- Ear, Nose, and Throat) तज्ज्ञ आणि ॲनेस्थेशिया विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून ब्रॉन्कोस्कोपीद्वारे(bronchoscopy) पेनाचे टोपण यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर मुलीची प्रकृती झपाट्याने सुधारली असून तिला नवजीवन मिळाले आहे.


या प्रकरणातील डॉक्टरांच्या मते, ही अत्यंत दुर्मिळ घटना असून परकीय वस्तू श्वासनलिकेत अतिशय खोलवर अडकल्यामुळे सुरुवातीला तिचे निदान करणे अवघड झाले. त्यामुळे लक्षणांवर आधारित उपचार सुरू राहिले. फुफ्फुसरोगतज्ज्ञ(Pulmonologist) डॉ. इंदू खोसला यांनी सांगितले की, दीर्घकाळ बरा न होणारा न्यूमोनिया(Pneumonia) किंवा सततचा संसर्ग दिसल्यास अनेकदा क्षयरोगाचा संशय घेतला जातो. मात्र अशा रुग्णांमध्ये आवश्यकतेनुसार सीटी स्कॅन(CityScan) आणि ब्रॉन्कोस्कोपीसारख्या(bronchoscopy)तपासण्या वेळेवर केल्यास अशा दुर्मिळ कारणांचाही शोध लागू शकतो.

Comments
Add Comment

मुंबईत मंत्रालयाजवळ बेस्ट बस आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबईतून एक मोठी आणि खळबळजनक अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मंत्रालयाजवळ वाय.

Ayodhya Special Train : मुंबई-अयोध्या प्रवासासाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेच्या 24 विशेष फेऱ्या; जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई: दसरा, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस

Devendra Fadnavis : 'यांचा जो कोणी आका असेल, त्याला लवकरच..' ; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर

Tree Plantation Badlapur : सरकारी प्रकल्पांमधील बाधित झाडांच्या बदल्यात पर्यायी वृक्ष लागवड बदलापुरला...खासगी इमारतींची मुंबईत

सचिन धानजी, मुंबई मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या विस्तारीत मुंबई सागरी किनारी रस्ता(मुंबई

Salman Khan And Lawrence Bishnoi : सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वैर पुन्हा चर्चेत; 2018 पासूनच्या धमक्या आणि हल्ल्यांचा घटनाक्रम

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर झालेल्या कथित गोळीबारानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे; 3 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी 3 अज्ञात