Nashik News : नाशिक जिल्ह्यातील ‘या’ १६ शाळांना शिक्षण विभागाची नोटीस

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील सोळा शाळांना राज्य शासनाची (State Government) आवश्यक परवानगी न घेता शाळा सुरू ठेवल्याप्रकरणी शिक्षण विभागाने नोटीस पाठवली आहे. तसेच जिल्ह्यातील १६ अनधिकृत शाळांना (Unauthorized Schools) कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून पालकांनाही पाल्यांचे तातडीने शासनमान्य शाळांमध्ये (Government recognized School) प्रवेश घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. (Nashik News)



शासन नियमांना केराची टोपली


नियमानुसार इयत्ता पहिली ते सातवी, पाचवी ते आठवी तसेच आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. २०१९ पूर्वी शिक्षण विभाग, शिक्षण उपसंचालक (Deputy Director of Education) आणि शिक्षण संचालक (Director of Education) कार्यालयामार्फत मान्यता दिली जात होती. मात्र, आता शाळांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो.



शासनाची पूर्वपरवानगी घेऊनच शाळा सुरु करावी लागते तरीही काही शाळांनी या सूचनांकडे कानाडोळा केल्याचं जिल्ह्यात पहायला मिळालं आहे. त्यामुळे मात्र या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मान्यतेचा प्रश्न भविष्यात निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने पालकांनी सावधगिरी बाळगून आपल्या पाल्यांचे प्रवेश अधिकृत परवानगीधारक शाळांमध्ये घ्यावेत, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. (Nashik News)



नोटीस बजावण्यात आलेल्या शाळा


नाशिक तालुका


अभिनव बालविकास मंदिर, मातोरी


चैतन्य टेक्नो स्कूल, चांदशी


निफाड तालुका


डी. व्ही. पी. मंडळ डे केअर सेंटर, नांदुर्डी


बागलाण तालुका


ड्रिम्स इंटरनॅशनल स्कूल, नामपूर


जिनियस किड्स अकॅडमी, नामपूर


मलबेरी बुश इंटरनॅशनल स्कूल, नामपूर


किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल, नामपूर


होरायझन अकॅडमी, शेमळी


चांदवड तालुका


कंचनसुधा इंटरनॅशनल स्कूल, शिंगवे


देवळा तालुका


एव्हरग्रीन स्कूल ऑफ एक्सलन्स, दहिवड


के. बी. इंग्लिश स्कूल, खारीपाडा


अभिनव बालविकास मंदिर


मालेगाव तालुका


मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल, टिंगरी


दिंडोरी तालुका


किड्स टाऊना इंग्लिश मीडियम स्कूल, वलखेड फाटा


बालभारती पब्लिक स्कूल, दिंडोरी (मराठी माध्यम)


बालभारती पब्लिक स्कूल, दिंडोरी (इंग्रजी माध्यम)



शासनाच्या परवानगीविना सुरू असलेल्या शाळांना आम्ही नोटिसा बजावल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश अधिकृत परवानगी असलेल्या शाळांमध्ये स्थलांतरित करावेत असे आवाहन नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी (Zilla Parishad Primary Education Officer Sailata Samleti) यांनी केले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण