Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमनाची चाहूल! मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांकडून गणेशोत्सव २०२६ च्या तयारीला विधिवत सुरुवात

मुंबई : अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळांनी पारंपरिक धार्मिक विधींनी उत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंतामणी आणि तेजुकाया या मानाच्या गणेश मंडळांमध्ये विविध पूजाविधी पार पडत असून बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Ganeshotsav 2026)



मुंबईचा राजा : ९८ व्या वर्षाची भक्तिमय सुरुवात


लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचा 'मुंबईचा राजा' यंदा आपल्या ९८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अशातच गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर मुंबईच्या राज्याचा पाद्यपूजन विधी सोहळा पार पडला. बाप्पाच्या चरणांचे पूजन करून गणेशोत्सवाच्या तयारीचा श्रीगणेशा करण्यात आला. गेली जवळपास शतकभर सुरू असलेली ही परंपरा भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानली जाते. (Ganeshotsav 2026)



१०७ वर्षांच्या परंपरेला सलाम; चिंतामणी मंडळात पाटपूजन


चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा १०७ व्या वर्षात प्रवेश केला आहे. मंडळात पाटपूजन विधी पार पडला. ज्या ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे, त्या स्थानाचे पूजन करून उत्सवाच्या तयारीला शुभारंभ करण्यात आला. (Ganeshotsav 2026)



तेजुकाया मंडळातही पाद्यपूजन :


मुंबईतील आणखी एक मानाचे तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याठिकाणीही पारंपरिक पाद्यपूजन विधी संपन्न झाला. यानंतर सजावट, देखावे, मूर्ती निर्मिती आणि इतर तयारीला वेग आला आहे. (Ganeshotsav 2026)



लालबागच्या राजाची ९३ व्या वर्षाची तयारी सुरू :


देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या ९३ व्या वर्षाच्या उत्सवाची तयारी जून महिन्यातच सुरू केली आहे. ९ जून २०२६ रोजी पहाटे गणेश मुहूर्त पूजन पार पडले. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे Famous Ganesh Pandalsयांच्या उपस्थितीत हा विधी झाला. यावेळी देणगी पावती पुस्तकांचे पूजनही पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. मंडळाचे खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा विधी पार पडला. (Ganeshotsav 2026)



गणेश गल्लीत यंदा 'वैष्णवांची वारी'ची भव्य सजावट :


यंदा गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपल्या सजावटीसाठी 'महाराष्ट्रातील संत परंपरा – वैष्णवांची वारी' हा आगळावेगळा विषय निवडला आहे. वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि भक्तीचा संदेश देणारा देखावा यंदा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. (Ganeshotsav 2026)



१४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम :


यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबर २०२६ (गणेश चतुर्थी) पासून सुरू होणार असून २५ सप्टेंबर २०२६ (अनंत चतुर्दशी) रोजी विसर्जन सोहळ्याने सांगता होणार आहे. मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांमध्ये तयारीला वेग आला असून, देखावे, रोषणाई, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे यंदाचा गणेशोत्सवही नेहमीप्रमाणे भव्य आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार असल्याचे चित्र दिसत आहे. (Ganeshotsav 2026)




Comments
Add Comment

मुंबईत मंत्रालयाजवळ बेस्ट बस आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबईतून एक मोठी आणि खळबळजनक अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मंत्रालयाजवळ वाय.

Ayodhya Special Train : मुंबई-अयोध्या प्रवासासाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेच्या 24 विशेष फेऱ्या; जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई: दसरा, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस

Devendra Fadnavis : 'यांचा जो कोणी आका असेल, त्याला लवकरच..' ; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर

Tree Plantation Badlapur : सरकारी प्रकल्पांमधील बाधित झाडांच्या बदल्यात पर्यायी वृक्ष लागवड बदलापुरला...खासगी इमारतींची मुंबईत

सचिन धानजी, मुंबई मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या विस्तारीत मुंबई सागरी किनारी रस्ता(मुंबई

Salman Khan And Lawrence Bishnoi : सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वैर पुन्हा चर्चेत; 2018 पासूनच्या धमक्या आणि हल्ल्यांचा घटनाक्रम

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर झालेल्या कथित गोळीबारानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे; 3 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी 3 अज्ञात