Wife Murders Husband : 'दृश्यम' पेक्षाही भारी! दोन वर्षांपासून बेपत्ता; अखेर १५ फूट खोल खड्ड्यात आढळला पतीचा मृतदेह

दारूमध्ये सायनाइड मिसळून केला खून, मृतदेह १५ फूट खोल खड्ड्यात पुरला; जामनगर पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला केली अटक


गुजरात : गुजरातमधील जामनगर येथे दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या दारूमध्ये सायनाइड मिसळून त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. खुनानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह १५ फूट खोल खड्ड्यात पुरण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. (Ahmedabad)


मृताचे नाव जिग्नेश धर्मेशभाई मावडिया असे असून, दोन वर्षांपूर्वी तो बेपत्ता झाल्याची तक्रार सिटी बी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान जिग्नेशची पत्नी पृथ्वी आणि निलेश मनसुखभाई कचेतिया यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. दोघांनी मिळून जिग्नेशचा काटा काढण्याचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. (Crime News)



पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी जिग्नेशच्या दारूमध्ये सायनाइड मिसळून त्याला ते पाजले. विषबाधेमुळे त्याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह दारेड परिसरातील एका भाड्याच्या कारखान्यात नेऊन १२ ते १५ फूट खोल खड्ड्यात पुरण्यात आला. (Murder News)


खुनानंतर पृथ्वीने कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी जिग्नेश ऑस्ट्रेलियात नोकरीसाठी गेला असल्याचे सांगितले. तो ज्या कंपनीत काम करतो, तेथे मोबाईल वापरण्यास बंदी असल्याचे कारण देत तिने जवळपास दोन वर्षे कुटुंबीयांना भ्रमात ठेवले.



तीच्यावर संशय आला अन् खेळ खल्लास


मात्र, जिग्नेशचा भाऊ अशोक मावडिया याने सातत्याने त्याच्याशी संपर्क साधण्याचा आग्रह धरला. तसेच पोलिसांत तक्रार करण्याचा दबाव वाढवल्यानंतर पृथ्वीच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. आरोपींच्या कबुलीनंतर कारखान्यात खोदकाम करण्यात आले असता न्यायवैद्यक पथकाच्या उपस्थितीत मानवी अवशेष सापडले.


या प्रकरणी पत्नी पृथ्वी आणि तिचा प्रियकर निलेश कचेतिया यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सापडलेल्या अवशेषांची शास्त्रीय तपासणी सुरू आहे. पुढील तपास जामनगर पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि