Mumbai High Court - FDA : अन्न व औषध प्रशासन विभागाने किती सरकारी कँटीनवर धाडी टाकल्या? अन्न व औषध प्रशासन मंडळाच्या धडक कारवाईवर हायकोर्टाचे ताशेरे!

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या धडक कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत थेट सवाल केला आहे. "एफडीएने आतापर्यंत किती सरकारी कँटीन, मंत्रालयातील उपहारगृहे किंवा मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांची तपासणी केली?" असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने केवळ खासगी आस्थापनांवर कारवाई न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. (Mumbai High Court - FDA)


बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने उपरोधिक टिप्पणी करत, "उद्या आमच्या डेस्कवर झुरळ आढळले तर न्यायालयाचे कामकाज बंद करायचे का?" असा सवाल उपस्थित केला.



खासगींसोबत सरकारी कँटीनचीही तपासणी करा :


गेल्या दोन महिन्यांत एफडीएने राज्यभरातील अनेक नामांकित हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांवर धडक कारवाया केल्या आहेत. नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा अन्न सुरक्षा परवाना रद्द करण्यात आल्यानंतर संबंधित हॉटेल व्यवस्थापनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. (Mumbai High Court - FDA)


या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, कारवाई केवळ खासगी क्षेत्रापुरती मर्यादित राहता कामा नये. सरकारी कार्यालयांतील कँटीन, मंत्रालय, उच्च न्यायालय परिसरातील उपहारगृहे तसेच मंत्र्यांशी संबंधित खाद्य व्यवसायांचीही तातडीने तपासणी करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने एफडीएला दिले. (Mumbai High Court - FDA)



९५ टक्के स्वच्छता; तरीही परवाना रद्द?


सुनावणीदरम्यान संबंधित पंचतारांकित हॉटेलमध्ये आवश्यक असलेल्या ७९ टक्के किमान स्वच्छतेच्या निकषाच्या तुलनेत तब्बल ९५ टक्के स्वच्छता असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. अशा परिस्थितीत किरकोळ त्रुटींवर थेट परवाना रद्द करणे किंवा आस्थापना बंद करण्याची कारवाई कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने हॉटेलला अंतरिम दिलासा दिला. (Mumbai High Court - FDA)



कारवाई करताना रोजगाराचाही विचार करा :


उच्च न्यायालयाने एफडीएला कारवाई करताना संबंधित आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचाही विचार करण्याचे निर्देश दिले. नियमभंग झाल्यास कठोर कारवाई आवश्यक असली तरी ती प्रमाणबद्ध, कायदेशीर आणि न्याय्य असावी, असे महत्त्वपूर्ण निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. दरम्यान, एफडीएच्या कारवाईच्या पद्धतीवर न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राज्यातील अन्न सुरक्षा तपासणीच्या कार्यपद्धतीवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. (Mumbai High Court - FDA)

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा