Prithviraj Chavan : पृथ्वीराज चौहाण यांची उपायुक्तपदी बढती, तर सहायक आयुक्तपदावरील आठ अधिकाऱ्यांची खांदेपालट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त डॉ पृथ्वीराज चौहाण यांची उपायुक्त पदावर बढती देण्यात आली असून या त्यांच्याकडे आता उपायुक्त(मध्यवर्ती खरेदी खाते) यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर सहायक आयुक्त पदावरील आठ अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली असून एम पूर्व विभागाचे सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले यांना ए विभागात तर सी विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांना पुन्हा एकदा एम पूर्व विभागात पाठवण्यात आले आहे. तर जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षिरसागर यांच्याकडे या पदाचा भार कायम ठेवतानाच त्यांच्याकडे करनिर्धारण व संकलन विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.



मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्तांपैंकी ए विभागाचे सहायक आयुक्त आणि करनिर्धारण व संकलन विभागाचा अतिरिक्त कार्यभारअसलेल्या गजानन बेेल्लाळे यांची बदली मालमत्ता विभागाच्या सहायक आयुक्तपदावर करण्यात आला. तर टी विभागाच्या सहायक आयुक्त योगिता कोल्हे यांच्याकडे टी विभागाची जबाबदारी कायम ठेवतानाच सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मुलन) पूर्व उपनगरेचा अतिरिक्त कार्यभार सोवण्यात आला आहे. तर सी विभागाच्या सहायक आयुक्तपदी जलअभियंता विभागातील कार्यकारी अभियंता सुनील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच त्यांच्याकडे बाजार विभागाच्या सहायक आयुक्तांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर पर्जन्य जलवाहिनी विभागातील कार्यकारी अभियंता वनिता कोकाटे यांच्याकडे के दक्षिण विभागाचा पूर्णकालिन कार्यभार सोपवण्यात आला आहे.


यापूर्वी ए विभागाचे सहायक आयुक्त असलेल्या आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता जयदीप मोरे यांच्याकडे १ ऑगस्ट २०२६ पासून एन विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.



सहायक आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या बदलीचे ठिकाण


पृथ्वीराज चौहाण : उपायुक्त मध्यवर्ती खरेदी खाते


अलका ससाणे : सहायक आयुक्त एम पूर्व विभाग


गजानन बेल्लाळे : सहायक आयुक्त मालमत्ता विभाग


स्वप्नजा क्षीरसागर : सहायक आयुक्त जी दक्षिण आणि करनिर्धारण व संकलन विभागाचा अतिरिक्त कार्यभार


उज्ज्वल इंगोले : सहायक आयुक्त ए विभाग


योगिता कोल्हे : सहायक आयुक्त टी विभाग, अतिक्रमण निर्मुलन पूर्व उपनगरे अतिरिक्त कार्यभार


सुनील माने : सहायक आयुक्त सी विभाग, बाजार विभाग अतिरिक्त कार्यभार


वनिता कोकाटे : सहायक आयुक्त के दक्षिण


जयदीप मोरे : सहायक आयुक्त एन विभाग अतिरिक्त कार्यभार

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक