Shambhuraj Desai : कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हल २०२६ होणार जागतिक दर्जाचा; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्राच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हल २०२६ अधिक भव्य, आकर्षक आणि जागतिक दर्जाचा आयोजित करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार या महोत्सवाच्या नियोजनाला वेग देण्यात आला असून, नैसर्गिक सौंदर्य, साहसी पर्यटन आणि स्थानिक संस्कृतीचा संगम घडविणारा हा महोत्सव राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी नवा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. (Koyna Dam)



मुंबईतील मेघदूत या शासकीय निवासस्थानी गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे माजी संचालक मंगेश जोशी, नवनियुक्त संचालक विकास पानसरे, उपसचिव संतोष रोकडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सोनवणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. सातारा जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.मागील वर्षीच्या महोत्सवाच्या अनुभवाचा आढावा घेऊन यंदाचा फेस्टिव्हल अधिक संस्मरणीय करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तंबू निवास (टेंट सिटी), जलक्रीडा, हाऊसबोटिंग, लेझर शो, ड्रोन शो, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य महोत्सव अधिक प्रभावीपणे आयोजित करण्याबरोबरच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रभावी ब्रँडिंगसाठी विविध ठिकाणी डिजिटल स्क्रीन उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. (Shambhuraj Desai)



पर्यंटकांना सुविधा उपलब्ध करुन द्या

यंदाच्या महोत्सवात पर्यटकांसाठी अनेक नवे आकर्षणांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामध्ये कार्निव्हल फेस्टिव्हल, फ्लोटिंग मार्केट, हेलिकॉप्टर राईड, घोडेस्वारी, पतंग महोत्सव, ऐतिहासिक वारसा स्थळांची (हेरिटेज) पर्यटन सफर आणि योगा उपक्रमांचा समावेश असेल. या माध्यमातून कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हलला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केले. ख्रिसमस ते नववर्ष या कालावधीत हा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि प्रभावी नियोजनासह आयोजित करण्यात येणार असून, देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा