Nashik Crime News : ​परदेशात एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांची साडेतीन कोटींची फसवणूक, इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik Fraud News : ​परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची तब्बल ३ कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रशियन करन्सी अर्थात रुबल एक्सचेंज करून देण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्यांची ही आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित शुभम राकेश सिंग (रा. कमल रो-हाऊस, ज्ञानेश्वर नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) याला पोलिसांनी अटक केली आहे. (Nashik Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


फिर्यादी पृथ्वीराज पदमसिंह चांडे आणि संशयित शुभम सिंग हे दोघेही रशियातील 'चेपॉक्सरी युनिव्हर्सिटी'मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी शुभम सिंगने स्वतःला भारतीय चलनाचे रशियन रुबलमध्ये रूपांतर करण्यासाठी विद्यापीठाने अधिकृत केल्याचा दावा केला. यासाठी त्याने बनावट अधिकारपत्रही दाखवले. सुरुवातीला काही लहान व्यवहार यशस्वीपणे करून देत त्याने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकला.(Nashik Crime News)


त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत पृथ्वीराजकडून ७ लाख रुपये, त्याच्या आठ मित्रांकडून ५३ लाख रुपये आणि विद्यापीठातील इतर आठ विद्यार्थ्यांकडून २ कोटी ८८ लाख रुपये अशी एकूण ३ कोटी ४८ लाख रुपयांची रक्कम करन्सी एक्सचेंजच्या नावाखाली स्वीकारली. मात्र, पैसे घेतल्यानंतर ना करन्सी एक्सचेंज करून दिली, ना विद्यार्थ्यांची रक्कम परत केली. (Nashik Crime News)



परीक्षा संपताच भारतात दाखल


फसवणुकीच्या काळात सर्व विद्यार्थी रशियात शिक्षण घेत असून त्यांच्या परीक्षा सुरू होत्या. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर भारतात परतलेल्या फिर्यादी पृथ्वीराज चांडे यांनी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी २८ जुलै रोजी शुभम राकेश सिंग याला अटक केली असून त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. फुंदे करीत आहेत.

Comments
Add Comment

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Gold Silver Rate Today : सोनं-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ! ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा

Gold Silver Rate Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड