Crime News : अभिनेत्री संभावना सेठने गाठले पोलीस स्टेशन; घरकाम करणाऱ्या बाईमुळे सहन करावा लागला त्रास

मुंबई : अभिनेत्री संभावना सेठ आणि तिचा पती अविनाश द्विवेदी यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्यांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या बाईमुळे त्यांना रात्रभर पोलीस ठाण्यात राहावं लागलं, असं नूद केलं होतं(Sambhana Seth)


काय झालं असं की संभावनाला पोलीस ठाण्यात जावं लागलं ?


संभावना आणि तिच्या पतीनं यूट्यूब चॅनलवर पोलीस ठाण्यात जावं लागण्याचं कारण सांगितलं आहे. संभावना सेठनं तिच्या मोलकरणीच्या बहिणीला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांविषयी सांगितले आहे. संभावनाने सांगितल्याप्रमाणे त्या महिलेला कोंडून ठेवण्यात आले होते, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि नवी मुंबईतील खारघर येथील एका घरात काम करण्यास भाग पाडले गेले होते.(Mumbai)



संभावनाचा पती अविनाश व्हिडीओत काय म्हणाला ?


"नमस्कार मित्रांनो, आमच्यासोबत एक खूप मोठी घटना घडली आहे आणि त्या घटनेबद्दल तुमच्याशी बोलणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण आम्हाला याबद्दल अनेक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायची आहे. हे कोणाच्याही आयुष्यात किंवा तुमच्या परिसरात घडू शकते. त्यामुळे, तुम्ही जागरूक असणे महत्त्वाचे आहे. दोन दिवसांपूर्वी, आमच्या घरी काम करणारी गुडिया अचानक रडू लागली. ती दिवसाचे २४ तास आमच्या घरातच असते. जेव्हा गुडिया रडू लागली, तेव्हा काय झाले हे आम्हाला समजले नाही?"


गुडियाने त्याला सांगितले की, तिची मोठी बहीण, जी खारघरमधील एका घरात एजन्सीमार्फत काम करत होती, तिला तिच्या इच्छेविरुद्ध कथितरित्या ओलीस ठेवण्यात आले होते. एजन्सीच्या कार्यपद्धतीबद्दल स्पष्टीकरण देताना तो म्हणाला की, तिला "१३ मांजरी आणि ५ कुत्र्यांची" काळजी घ्यावी लागेल असे सांगितल्यामुळे ती सुरुवातीला त्या घरात काम करण्यास तयार झाली होती. तो पुढे म्हणाला, "सुरुवातीला, त्यांनी गोड बोलून तिचे मन वळवले. २-३ दिवसांनंतर, त्यांनी तिच्या कामाचा भार वाढवायला सुरुवात केली. तिला स्वयंपाक करणे, घर स्वच्छ करणे आणि इतर अनेक कामे करावी लागत होती. मात्र, सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर तिला पोटाचा त्रास होता आणि ती जड काम करू शकत नव्हती."(Crime News)



जेव्हा त्या महिलेने काम करण्यास नकार दिला तेव्हा मालकांनी एजन्सीला आधीच पैसे दिल्याचे सांगून तिने पुन्हा काम करण्यास सांगितलं. अविनाशला एजन्सीकडून माहिती मिळाली की त्यांनी कोणतेही पैसे दिले नाहीत. संभावना म्हणाली, "ती रडत होती आणि मला तिला वाचवण्याची विनंती करत होती. तिने मला सांगितले की सकाळपासून तिला चार वेळा उलट्या झाल्या होत्या. तिला जेवण दिले नसल्यामुळे ती भुकेली होती."


जेव्हा एजन्सीने फ्लॅटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले. त्यानंतर संभावनाने घरात असलेल्या महिलेशी थेट संपर्क साधला. संभावना म्हणाली, "मी त्या महिलेला फोन केला आणि तिने मला विचारले की मी कोण आहे. जेव्हा तिने मला ओळखले, तेव्हा ती म्हणाली की ती माझी खूप मोठी चाहती आहे. तिचा सूर पूर्णपणे बदलला."



महिलेने एजन्सीकडून आलेल्या मोलकरणीला घरात ओलीस ठेवले होते. तिचे ओळखपत्र हिसकावून घेतले, तिचे कपडे लपवले आणि तिला सांगितले, 'आता जा आणि आम्हाला दाखव तू इथून कशी बाहेर पडतेस; असे संभावनाने व्हिडीओत सांगितले. खारघरच्या घरात ओलीस असलेल्या महिलेच्या सुटकेसाठी एका महिलेने मदत केल्याचे संभावना म्हणाली.


मदत करणारी महिला माझी चाहती होती आणि तिने घरात प्रवेश करून मोलकरणीच्या सुटकेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. घरात ओलीस असलेल्या महिलेने संधी मिळताच पळ काढला. ती पळत असताना घरमालकाने मारहाण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे जखमी झाली. पण संबंधित महिलेने तसेच माझी चाहती असलेल्या महिलेने तिथून हुशारीने पलायन केले.



संभावना म्हणाली की, जर वेळेवर मदत पोहोचली नसती, तर त्या घरकाम करणाऱ्या महिलेचा जीव गेला असता. या अभिनेत्रीने खारघर पोलिसांच्या सुरुवातीच्या प्रतिसादावरही टीका केली. ती म्हणाली, "पोलिसांनी मदत केली नाही. जर त्यांनी त्यावेळी मदत केली असती, तर परिस्थिती इतकी चिघळली नसती. तिचा जीवही गेला असता. बांगूर नगर पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि टीमचे आभार. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आधीच्या घटनेबद्दल आमची माफी मागितली. एका अधिकाऱ्याने सकाळी ८ वाजेपर्यंत आमचे म्हणणे ऐकून घेतले

Comments
Add Comment

परकीय शक्तींच्या मदतीने देशात अराजकता पसरवण्याचे विरोधकांचे मनसुबे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जहरी टीका

मुंबई: “विरोधक सुप्रीम कोर्टावर मोर्चे काढतात, चाल करुन जातात, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करतात, दिल्लीत

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

INDW vs ZIMW: नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, कर्णधार स्मृती मंधानाने गोलंदाजी निवडत म्हणाली..

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना होत आहे. कर्णधार स्मृती मंधानाने पूर्णवेळ कर्णधारपदाची