Chembur Tree Collapse : चेंबूर झाड दुर्घटनेची त्रयस्थ एकसदस्यीय समितीमार्फत होणार सखोल चौकशी

फेर चौकशीसाठी वनस्पती शास्त्राचे तज्ज्ञ व माजी कुलगुरु प्रा. डॉ. संजय देशमुख यांची महानगरपालिका प्रशासनाकडून नेमणूक


एक महिन्यात समिती सादर करणार अहवाल


मुंबई : चेंबूर (Chembur) येथील झाड दुर्घटनेप्रकरणी फेर चौकशी करण्याची मागणी महापालिका सभागृहात झाल्यानंतर आणि महापौरांनी मागणी केल्यानंतर आता महानगरपालिका प्रशासनाने वनस्पती शास्त्राचे तज्ज्ञ तथा माजी कुलगुरु प्रा. डॉ. संजय देशमुख यांची एकसदस्यीय समिती म्हणून नेमणूक केली आहे. या त्रयस्थ समितीने एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

चेंबूर परिसरातील डायमंड उद्यानाजवळ एका शाळकरी बसवर ३० जून २०२६ रोजी दुपारी पिंपळाचे जुने आणि मोठे झाड कोसळून (Tree Collapse) ओढवलेल्या दुर्दैवी घटनेत विहान श्रीवास्तव (वय ११ वर्षे) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अन्य चार विद्यार्थी जखमी झाले. चेंबूर येथील या दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रारंभी समिती गठीत केली होती. या समितीने सादर केलेला सविस्तर अहवाल मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच महानगरपालिका सभेने अमान्य केला होता. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सखोल तपास, सक्त कारवाई व कठोर दंडात्मक शिफारशींचा अभाव असल्याचे नमूद करुन महापौर तसेच महासभेने हा प्रारंभिक अहवाल अमान्य केला. तसेच त्रयस्थ व तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करुन फेरचौकशी करण्याचे निर्देशही दिले होते.



फेरचौकशीसाठी महानगरपालिका प्रशासनाने नियुक्त केलेले प्रा. डॉ. संजय व्ही. देशमुख हे वनस्पती शास्त्राचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी कांदळवने (Mangroves) बाबत भरीव कार्य केलेले आहे. तसेच, त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून ही कार्य केले आहे. सध्या ते इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (मुंबई) येथे अधिवक्ता प्राध्यापक तसेच एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई (The Asiatic Society of Mumbai) येथे उपाध्यक्ष पदावरही कार्यरत आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव व कार्य विचारात घेऊन, त्यांची या चौकशी समितीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर एकसदस्यीय समिती खालील बाबींचा अभ्यास करुन आपला अहवाल एक महिन्यात सादर करेल.

या समितीस चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देणे, स्थळ भेटीच्या वेळी उपस्थित राहणे याबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांना निर्देश देण्यात येतील. समितीस अहवाल सादर करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य सर्व संबंधित विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाने नियुक्ती पत्रात नमूद केले आहे

समितीत कोणते निकष आणि बाबींवर होणार चौकशी


- प्राथमिक चौकशी समितीने वापरलेल्या कार्यपद्धतीचे परीक्षण

- प्राथमिक चौकशी समितीने सादर केलेल्या पुराव्यांचे स्वतंत्र विश्लेषण

- अभियांत्रिकी, वनस्पतीशास्त्र, पर्यावरण शास्त्र, जलनिःसारण, मलनिःसारण, रस्ता बांधणी, हवामान, मृदाशास्त्र व सार्वजनिक प्रशासन या दृष्टिकोनातून प्राथमिक चौकशी अहवालाचे चिकित्सक मूल्यमापन

- प्राथमिक चौकशी निरीक्षणाचे वैज्ञानिक परीक्षण

- घटनेच्या मूळ कारणाचे स्वतंत्र विश्लेषण

- प्राथमिक चौकशी समितीने सूचविलेल्या अंतरिम उपाययोजनांचे मूल्यांकन

- अहवालातील शिफारशींचे समीक्षात्मक परीक्षण

- माननीय महानगरपालिकेस सादर करण्यासाठी स्वतंत्र अर्थबोधक मूल्यांकन अहवाल

- भविष्यातील धोरणात्मक सुधारणा सुचविणे
Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य