Pune News : मुळशी फिरायला जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! PMPML विशेष पर्यटन बस सुरू; अवघ्या ₹500 मध्ये निसर्ग सफर

पुणे स्टेशन ते मुळशी विशेष बससेवा सुरू; शिवालय मंदिर, जेटी बोटिंग, मुळशी धरण आणि पळसे धबधबा एका ट्रिपमध्ये


पुणे : पावसाळ्यात मुळशी (Mulshi) आणि ताम्हिणी घाट (Tamhini Ghat) परिसरात फिरण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करतात. मात्र, वीकेंडला होणारी वाहतूक कोंडी आणि प्रवासातील गैरसोय लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पर्यटकांसाठी विशेष पर्यटन बससेवा सुरू केली आहे. 'विशेष पर्यटन बससेवा क्रमांक 9 अ'च्या माध्यमातून पुणेकरांना अवघ्या 500 रुपयांत मुळशीतील प्रमुख पर्यटनस्थळांची सफर करता येणार आहे.


ही विशेष बस पुणे स्टेशन येथून प्रवासाला सुरुवात करणार असून स्वारगेट आणि डेक्कन जिमखाना मार्गे मुळशी परिसरात पोहोचेल. या एकाच प्रवासात पर्यटकांना मुळशी शिवालय मंदिर, जेटी बोटिंग, टाटा मुळशी धरण आणि पळसे धबधबा या प्रमुख पर्यटनस्थळांना भेट देता येणार आहे. दिवसभराची सफर पूर्ण करून ही बस पुन्हा डेक्कन, स्वारगेट मार्गे पुणे स्टेशनला परतणार आहे. (PMPML)



पीएमपीचे अध्यक्ष महेश आव्हाड यांच्या निर्देशानुसार ही विशेष पर्यटन बससेवा 29 जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. सध्या पीएमपीकडून शहरात 13 पर्यटन मार्गांवर विशेष बससेवा सुरू असून, मुळशी पर्यटन मार्गाची नव्याने भर पडली आहे. (Bus Service)


या बससेवेसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन या आठ आरक्षण केंद्रांवर तिकीट उपलब्ध आहेत. (One Day Trip)


पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरणाचा सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी या विशेष पर्यटन बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने