Girish Mahajan : भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीची मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी; मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत

दोषींवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश



मुंबई : भिवंडी येथे घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंत्री महाजन यांनी जाहीर केली. तसेच या दुर्घटनेप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.



घटनास्थळी भेट दिल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनाकडून बचाव व मदतकार्याची सविस्तर माहिती घेतली. आपत्तीग्रस्तांना तातडीने सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्यांचे महाजन यांनी सांगितले. दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने सर्वोत्तम वैद्यकीय उपचार केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.



सुरक्षेचा उपाय म्हणून दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या शेजारील इमारतींमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, त्यांच्या राहण्याची व भोजनाची योग्य व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. आपत्तीच्या काळात सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहनही महाजन यांनी केले.



दरम्यान, भिवंडीतील इमारत दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात शासन पाठीशी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केल्या. याप्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.



या पाहणीवेळी स्थानिक खासदार सुरेश म्हात्रे, माजी मंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुले, महापौर नारायण चौधरी, जिल्हाधिकारी श्रीकांत पांचाळ यांच्यासह पालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा