Nipun : स्वदेशी बनावटीची दुसरी पाणबुडी सहाय्य युद्धनौका ‘निपुण’ नौदलाकडे सुपूर्द

विशाखापट्टणम : हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने बांधलेली 'निपुण' ही दुसरी पाणबुडी सहाय्य युद्धनौका 30 जुलै रोजी विशाखापट्टणम इथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. या जहाजाची रचना आणि बांधणी 'इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग' (IRS) च्या नियमांनुसार करण्यात आली आहे. 'निपुण' हे नाव संस्कृतमधून घेण्यात आले असून, त्याचा अर्थ 'विशिष्ट विषयात प्रवीण, सक्षम आणि जाणकार असलेली व्यक्ती' असा होतो. नावाप्रमाणेच, ही युद्धनौका अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून खोल समुद्रातल्या मोहिमा आणि बचाव कार्यासाठी सक्षम आहे.



या जहाजावर अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणे बसवण्यात आली असून त्यात 'खोल समुद्रात बुडी मारण्याची' क्षमता आहे. समुद्रातल्या मोहिमांसाठी या नौकेवर एक साइड डायव्हिंग मंचही तयार करण्यात आला आहे. दूरसंचालित वाहनांमुळे डायव्हर्सवर देखरेख आणि सुटका मोहिमा सुलभ होऊन जहाजाच्या परिचालन क्षमता आणखी वाढतात. याव्यतिरिक्त, पाणबुडीमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हे जहाज 'डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेसेल' (DSRV) साठी 'मदर शिप' म्हणूनही काम करेल.



सुमारे 75 टक्के स्वदेशी सामग्रीसह 'आत्मनिर्भर भारत' या सरकारच्या संकल्पनेला पाठबळ देणाऱ्या भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या वाटचालीतील 'निपुण' चे वितरण हा आणखी एक मैलाचा दगड आहे. या नौकेच्या समावेशामुळे खोल समुद्रातील मोहिमांच्या विशिष्ट क्षेत्रात भारतीय नौदलाची क्षमता बळकट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा