Dr. Mohan Bhagwat : “संघ आणि राष्ट्रकार्य हेडगेवार यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग” — डॉ. मोहन भागवत

डॉ. हेडगेवार यांच्या ऐतिहासिक निवासस्थानावर विशेष टपाल आवरणाचे लोकार्पण


नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनात संघकार्य आणि राष्ट्रकार्य याशिवाय इतर कुठल्याही गोष्टीला स्थान नव्हते. तसेच संघ आणि डॉ. हेडगेवर हे अविभाज्य असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. भारतीय टपाल विभागातर्फे डॉ हेडगेवारांच्या निवासस्थानावर आधारित “डॉ. हेडगेवार निवास, नागपूर” या विशेष टपाल आवरणाचे, माहिती पुस्तिका आणि स्थायी सचित्र टपाल मुद्रेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. भागवत बोलत होते. (Dr. Mohan Bhagwat)


याप्रसंगी संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया, डॉ. सुधीर जाखेरे, डाक सेवा नागपूर क्षेत्राचे संचालक रामचंद्र जायभाये, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळातील अधिकारी व कर्मचारी तसेच डॉ. हेडगेवार स्मारक समिती, नागपूरचे सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, राष्ट्रकार्य आणि संघकार्य हे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या जीवनाचे अविभाज्य भाग राहिले आहेत. संघ आणि डॉ. हेडगेवार यांना वेगळे करून पाहता येणार नाही. (RSS Chief)


नागपूरच्या शुक्रवारी परिसरात असलेल्या डॉ. हेडगेवार यांच्या याच ऐतिहासिक इमारतीच्या वरच्या मजल्यावरील छोट्याशा खोलीत विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती.त्यावेळी संघाचे स्वरूप मर्यादित होते, मात्र आज त्याचे कार्य देश-विदेशात विस्तारले आहे. डॉ. भागवत यांनी सांगितले की, संघाच्या कार्याबद्दल देश-विदेशातील लोकांची रुची आणि जिज्ञासा सातत्याने वाढत आहे. मनुष्यनिर्माणाची संघाची कार्यपद्धती आज अनेक देशांसाठीही उपयुक्त आणि आवश्यक ठरत आहे. व्यक्तिनिर्माणाची ही प्रभावी प्रक्रिया समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.सरसंघचालक म्हणून संघकार्याचा विस्तार हा केवळ गौरवाचा विषय नसून वाढत्या जबाबदारीचे आणि कर्तव्याचे प्रतीक आहे. संघाने नेहमीच राष्ट्रसेवेला प्राधान्य दिले आहे आणि कधीही प्रचार-प्रसार किंवा प्रसिद्धीची अपेक्षा ठेवली नाही. आज समाज आणि जग जेव्हा या कार्याचे परिणाम पाहत आहे, तेव्हा अनेक लोक सहकार्याच्या भावनेने या कार्याशी जोडले जाण्यासाठी पुढे येत असल्याचे सरसंघचालकांनी नमूद केले.


सरसंघचालकांनी भारतीय टपाल विभागाचे आभार मानताना सांगितले की, विशेष टपाल आवरण, माहिती पुस्तिका आणि स्थायी सचित्र टपाल मुद्रा जारी करून विभागाने मनुष्यनिर्माणाच्या या कार्याप्रती आपली सद्भावना व्यक्त केली आहे. यामुळे डॉ. हेडगेवार यांच्या विचारांची आणि संघाच्या उद्दिष्टांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल तसेच समाजातील सेवा कार्यांना नवीन गती मिळेल. राष्ट्राच्या अपेक्षांनुसार चारित्र्यवान, सक्षम आणि सेवाभावी नागरिक घडविण्याचे कार्य भविष्यातही अधिक वेगाने पुढे जाईल. या दिशेने समाजाचे सहकार्य महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास सरसंघचालकांनी व्यक्त केला. (Indian Politics)

Comments
Add Comment

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा