Nashik Crime News : पॉक्सो प्रकरणात मदतीसाठी २० हजारांची लाच; सुरगाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा पोलीस ठाण्यातील (Surgana Police Station) एका पोलीस उपनिरीक्षकाला पॉक्सो (POCSO) प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) रंगेहात पकडले आहे. या कारवाईत एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले असून या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिवाजी दवंगे (वय ५७, तारा निवास, साईनगर, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड) आणि खासगी व्यक्ती इब्राहिम करीम वाणी (वय २८, जामुनमाथा, भोरमाळ, ता. सुरगाणा) अशी संशयितांची नावे आहेत. (Nashik Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध सुरगाणा पोलीस ठाण्यात (Surgana Police Station) गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पॉक्सो कायद्याची कलमे वाढवून त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो कारागृहात होता. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे यांनी १९ जून २०२६ रोजी तक्रारदारास पोलीस ठाण्यात बोलावून दिवसभर बसवून ठेवले. तक्रारदार व त्यांच्या पत्नीला गुन्ह्यात आरोपी करण्याची धमकी देत, आरोपी करायचे नसल्यास आणि या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Corruption Bureau) तक्रार केली. (Nashik Crime News)



तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य


या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी उपनिरीक्षक दवंगे आणि तक्रारदार यांच्यात या संदर्भात चर्चा झाली. पंचांसमक्ष ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. सुरुवातीच्या काही प्रयत्नांमध्ये आरोपी उपनिरीक्षकाने लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. म्हणजेच २१ आणि २४ जून रोजी तक्रारदारास लाचेची रक्कम देण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र, उपनिरीक्षक दवंगे बाहेर असल्याने त्यांची भेट झाली नाही. (Nashik Crime News)



पोलीस उपनिरीक्षक रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात


त्यानंतर ३० जून रोजी पंचांसह तक्रारदारास लाच देण्यासाठी पाठविण्यात आले असता, उपनिरीक्षक दवंगे यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली.मात्र, अखेर त्यांनी तक्रारदाराला ही रक्कम सुरगाणा पोलीस ठाण्याजवळील एका किराणा दुकानात काम करणाऱ्या इब्राहिम वाणी याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने २० हजार रुपये दिल्यानंतर इब्राहिम वाणी याने ती रक्कम स्वीकारली आणि त्याच माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक दवंगे यांच्यापर्यंत लाच पोहोचल्याची खात्री होताच एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले. (Nashik Crime News)



गुन्हा दाखल, तपास सुरु


या प्रकरणी दोघांविरुद्ध सुरगाणा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांनी कारवाईचे नेतृत्व केले. दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''